धमकीचे फोन, बड्या लोकांकडून दबाव…अदर पूनावाला देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या विचारात
भारतात कोरोनाविरुद्ध लढाईत लस उत्पादन करणारे सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला लसीचं उत्पादन भारताबाहेर नेण्याच्या विचारात आहेत. लसीच्या पुरवठ्याबाबत भारतातील विविध घटकांकडून येत असलेला दबाव आणि ठरलेल्या वेळेत लस उत्पादनाबद्दलचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यामुळे सीरम अशा पद्धतीचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. सीरमचे सीईओ अदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून ‘द टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला […]
ADVERTISEMENT
भारतात कोरोनाविरुद्ध लढाईत लस उत्पादन करणारे सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला लसीचं उत्पादन भारताबाहेर नेण्याच्या विचारात आहेत. लसीच्या पुरवठ्याबाबत भारतातील विविध घटकांकडून येत असलेला दबाव आणि ठरलेल्या वेळेत लस उत्पादनाबद्दलचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यामुळे सीरम अशा पद्धतीचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. सीरमचे सीईओ अदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून ‘द टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे सरकार शाबासकीसाठी पात्र ! भाजप खासदाराने केलं राज्य सरकारचं कौतुक
पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशिल्ड ही लस तयार तयार करते आहे. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला लसीच्या पुरवठ्यासाठी फोन येत असल्याचं सांगितलं. ज्यात विविध राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगपती आणि अन्य लोकं लसीच्या पुरवठा लवकर करावा यासाठी सांगत असल्याचंही पूनावाला यांनी सांगितलं. सीरममध्ये बनवण्यात येणारी कोविशिल्ड ही लस भारतातील बहुतांश राज्यात नागरिकांना दिली जात आहे.
हे वाचलं का?
लसींचे दोन लाख डोस घेऊन जाणारा ट्रक आढळला बेवारस अवस्थेत, वाचा कुठे घडली घटना?
“लसीच्या पुरवठ्याबद्दल धमकी मिळणं हे खरंतर मी खूप सौम्य शब्दात सांगतोय. लसीचा पुरवठा व्हावा यासाठी असलेली अपेक्षा आणि त्यासाठी असलेली आक्रमकता ही खरंच न समजण्यासारखी आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लस मिळाली पाहिजे. पण त्यांना ही गोष्ट कळत नाही की काही लोकांना त्यांच्या आधी लस मिळणं गरजेचं आहे. जर आम्हाला लस मिळाली नाही तर चांगलं होणार नाही अशा पद्धतीने फोन कॉल्स मला येत आहेत.” पूनावाला यांनी आपल्याला येणाऱ्या फोन कॉल्सविषयी माहिती दिली.
ADVERTISEMENT
“येणाऱ्या फोनकॉल्सची भाषा ही शिवराळ नसली तर त्यांची आक्रमकता मला जाणवते आहे. जर माझ्याकडून लसीचा पुरवठा झाला नाही तर काय होईल याची ही एक झलक आहे. हे फोन कॉल्स वारंवार येत आहेत…आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही काम करु शकणार नाही असं चित्र तयार होतंय. अशा परिस्थितीत मला भारतात रहायचं नाहीये, त्यामुळे मी लंडनमध्ये थोडावेळ राहणार आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या खांद्यावर येऊन पडत आहेत…मी हे सर्व एकटा करु शकणार नाहीये. तुम्ही तुमचं काम नित्यनेमाने करत असता पण काही व्यक्तींच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे ते काय करतील याची कल्पना नसणं अशा वातावरणात मला रहायचं नाहीये.”
ADVERTISEMENT
या मुलाखतीत बोलत असताना पूनावाला यांनी येत्या काळात लस उत्पादन हे भारताबाहेर सुरु करण्याचे संकेत दिले. सीरम येत्या काळात लसीचं उत्पादन हे ब्रिटनमध्ये सुरु करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय. येत्या काही काळात याबद्दलची घोषणा केली जाईल असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT