आधी गुंगीचं औषध देऊन केला बलात्कार; नंतर…; 42 वर्षीय नराधमाला बेड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा घटना सुरूच आहे. एका तरुणीवर दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

अतुल बाजीराव पाटील (वय ४२, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) असं आरोपीचं नाव आहे. त्याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपीने तरुणीच्या घरी जाऊन तिला बिर्याणीतून गुंगीचे औषध दिले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करत होता.

हे वाचलं का?

बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर सॉरी बोलून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

नेमकी घटना काय?

ADVERTISEMENT

अतुल पाटील याचे पीडित तरुणीच्या घरी येणं-जाणं होतं. दोन वर्षांपूर्वी अतुल हा तरूणीच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडिता घरात एकटी होती. आरोपीनं तिच्यासाठी बिर्याणी आणली. बिर्याणीत गुंगीचे औषध मिसळले. ती बिर्याणी खाल्ल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून केलेल्या याचे चित्रीकरणही केलं.

ADVERTISEMENT

डोंबिवलीत पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती! नरामधम बापाचा 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बलात्काराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरू होते. अखेर या अत्याचारांना कंटाळून तरुणीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून तिच्या पालकांना धक्काच बसला. पालकांनी जाब विचारल्यानंतर आरोपी पीडितेच्या पालकांनाही धमकावू लागला होता. अतुल पाटील ते फोटो-व्हिडीओ वायरल करण्याची तसेच पीडितेचं लग्न होवू देणार नाही, अशी धमकी तरूणीच्या आईवडिलांना देत होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT