Mumbai Vaccination: गुड न्यूज… मुंबईकरांना सहजपणे मिळू शकते कोरोना लस!
मुंबई: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोरोना काळात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) सापडले आहेत. त्यामुळे लसीकरणात महाराष्ट्राला अधिकाधिक प्राधान्य दिलं जावं असं सातत्याने सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील (Mumbai) लसीकरणाचा वेग […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोरोना काळात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) सापडले आहेत. त्यामुळे लसीकरणात महाराष्ट्राला अधिकाधिक प्राधान्य दिलं जावं असं सातत्याने सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील (Mumbai) लसीकरणाचा वेग घटला होता. तसंच अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रं (Vaccination Centers) बंद करण्यात आली होती. मात्र आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईत आता अनेक ठिकाणी लस उपलब्ध आहेत.
जर आपण मुंबईत राहत असाल आणि आपल्याला लस हवी असेल तर त्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाही. कारण मुंबईतील अनेक विभागात मुंबई महापालिकेकडून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईकर कोविन अॅपवरुन आपला स्लॉट बुक करुन लस घेण्यासाठी जाऊ शकतात. मात्र, थेट लसीकरण केंद्रावर येऊन लस घेण्याची सुविधा देखील मुंबई महापालिकेने सुरु केली आहे.
हे वाचलं का?
जून महिन्यात Serum Institute लसीचे १० कोटी डोस पुरवणार, लसीकरणाला वेग मिळण्याची शक्यता
कोव्हिशिल्ड (Covishield) : मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज (31 मे 2021) कोव्हिशिल्ड लसीसाठी तब्बल 182 लसीकरण केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिथे 45 वयोगटाच्या वरील व दिव्यांग नागरिकांना थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. याशिवाय आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचारी हे देखील आपला दुसरा डोस थेट केंद्रावर जाऊन घेऊ शकतात.
ADVERTISEMENT
३१ मे,२०२१ रोजी कोविशिल्ड लस लसीकरण केंद्रांची यादी
-४५+ व दिव्यांग नागरिक: दोन्ही डोस
-आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी: दुसरा डोस(पहिल्या डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य)
-स्तनदा माता (प्रसूतीनंतर १ वर्षापर्यंत- बाळाचा जन्मदाखला अनिवार्य)केंद्रावर थेट जाऊन लस घेता येईल.
वेळ: स.10 ते दु.3 pic.twitter.com/EsAjeSbQex— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2021
याशिवाय मुंबईत 74 लसीकरण केंद्र अशी आहेत की, जिथे 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस मिळू शकतो.
ADVERTISEMENT
कोविशील्ड लस उपलब्ध असलेले उर्वरित केंद्रं#MyBMCVaccinationUpdate#WeShallOvercome https://t.co/gzgBHcwCWV pic.twitter.com/MLfnNXlaWh
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2021
Vaccination बाबत मोदी सरकारच्या कोणत्या चुकीच्या निर्णयांमुळे भासतोय लस तुटवडा?
कोव्हॅक्सिन (Covaxin) : दरम्यान, मुंबई महापालिकेने कोव्हिशिल्डशिवाय कोव्हॅक्सिन लस कुठे मिळेल याची देखील यादी जाहीर केली आहे. जिथे देखील थेट लसीकरण केंद्रावर जाऊन कोव्हॅक्सिन लस टोचून घेता येणार आहे. मुंबईत 28 ठिकाणी कोव्हॅक्सिनची लस मिळणार आहे. मात्र, यावेळी फक्त ज्यांचा दुसरा डोस असणार आहे त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
३१ मे, २०२१ कोव्हॅक्सीन लस देणाऱ्या लसीकरण केंद्रांची यादी.
केवळ दुसरा डोस उपलब्ध.
कृपया पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आणायला विसरू नका.
वॉक-इन लसीकरण.
वेळ: सकाळी १० ते दु. ३#MyBMCVaccinationUpdate pic.twitter.com/PfYJBKmILG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2021
याचाच अर्थ सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असून जास्तीत जास्त प्रमाणात मुंबईकरांना व्हॅक्सिनेट करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा आहे. ही मुंबईकरांसाठी एक चांगली बाब आहे.
तसेच मागील काही दिवसांपासून कोविन अॅपमध्ये देखील मुंबईतील लसीकरण केंद्रावर सहजपणे स्लॉट उपलब्ध होत असल्याचं पाहायला मिळत होतं. ज्यामुळे मुंबईकर आता सहजपणे लस घेऊ शकतात.
थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
सुरुवातीच्या काळात मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट पाहायला मिळत होते. मुंबईत अत्यंत वेगाने कोरोना रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे जेवढ्या लवकर मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण होईल तेवढ्या लवकर मुंबई कोरोनामुक्त होण्याची शक्यता जास्त आहे.
मात्र, असं असलं तरीही मुंबईतील हे लसीकरण फक्त 45 वयाच्या नागरिकांसाठीच सुरु आहे. अद्यापही 18 ते 44 वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरु झालेलं नाही. या वयोगटातील नागरिकांचा आकडा देखील फार मोठा आहे. त्यामुळे या नागरिकांसाठी देखील अशाच प्रकारे लसीकरण सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
दुसरीकडे मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. तरच महाराष्ट्र देखील कोरोनामुक्त होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT