Vaccine Roadmap: डिसेंबरपर्यंत सरकारला मिळणार लसीचे ‘एवढे’ कोटी डोस, पाहा कसा असेल सरकारचा रोडमॅप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काहीशी नियंत्रणात आली असली तरीही तिसरी लाट देखील येऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. अशावेळी सरकारसमोर एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे भारतातील संपूर्ण जनतेचं लसीकरण. खरं तर देशात आतपर्यंत लसीचे 23 कोटी डोस देण्यात आले आहेत. अशावेळी डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारने एक रोडमॅप देखील तयार केला आहे.

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचं संपूर्ण लक्ष सध्या लसींचं उत्पादन कसं वाढेल यावरच आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा फक्त देशात दोन लस उपलब्ध होत्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींनाच परवानगी मिळाली होती. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूने जानेवारी ते मे महिन्यापर्यंत सरासरी 6 ते 6.5 कोटी म्हणजे एकूण 30 ते 31 कोटी डोस उत्पादित केले आहेत.

Big News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस-पंतप्रधान

हे वाचलं का?

जाणून घेऊयात सरकारचा लसीकरणाबाबत नेमका रोडमॅप कसा असेल:

संपूर्ण देशात 18 वर्षावरील एकूण लोकसंख्या ही जवळपास 94 कोटी एवढी आहे. त्यामुळे एवढ्या लोकसंख्येचं जर आपल्याला लसीकरण करायचं असेल तर त्यासाठी तब्बल 188 कोटी डोसची आवश्यकता आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, आतापर्यंत 23 कोटी डोस दिले गेले आहेत. म्हणजे आता आपल्या 165 कोटी डोसची आवश्यकता आहे. अशावेळी केंद्र सरकारने लसीकरणाचं हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. ज्यानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत देशातील 94 कोटी लोकांचं (18 वर्षावरील) लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

ADVERTISEMENT

लसीकरण पूर्ण कसं केलं जाणार?

आतापर्यंतचं लसीकरण लक्षात घेतल्यास 23 कोटी डोस देण्यात आले आहेत त्यामुळे आता 165 कोटी डोसची आवश्यकता आहे. अशावेळी जून महिन्यात 12 कोटी आणि जुलै महिन्यात 16 कोटी डोस सरकारला मिळणार आहेत. म्हणजे पुढील दोन महिन्यात एकूण 28 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत.

जून-जुलै या दोन महिन्यात 28 कोटी डोस मिळाल्यास पुढील पाच महिन्यात 137 कोटी लसींची गरज भासणार आहे. दरम्यान, देशांतर्गत लस उत्पादकांकडून केंद्र सरकारला जुलैपर्यंत 150 रुपये प्रति डोस मिळणार आहे.

Corona Vaccine: लसीबाबत आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर

जुलै महिन्यानंतर लस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता:

दरम्यान, जुलैनंतर लसींचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर 2021 पर्यंत लसीचं उत्पादन वाढून जे लक्ष्य सरकारने डोळ्यासमोर ठेवलं आहे ते पूर्ण केलं जाईल.

त्यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर 2021 पर्यंत सीरम इन्स्टिट्यूट 50 कोट भारत बायोटेक 38 कोटी, Protein Subunit Vaccine Bio-E 30 कोटी, DNA ZYDUS CADILA 5 कोटी आणि Sputnik चे 10 कोटी सरकारला मिळणार आहेत. म्हणजेच तब्बल एकूण 133 कोटी डोस मिळणार आहेत.

यामध्ये फायझर आणि मॉर्डना आणि इतर कंपन्यांकडून काही प्रमाणात लसी मिळणार आहेत. त्यामुळे डिसेंबर 2021 पर्यंत भारतातील जवळजवळ 94 कोटी प्रौढ लोकसंख्येचं (adult population) लसीकरण पूर्ण होऊ शकतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT