Gujarat Election Results : नरेंद्र मोदींना 3 वेळा जे जमलं नाही, ते या निवडणुकीत घडलंय! 1985 ला काय घडलं होतं?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘नरेंद्रचे सर्व रेकॉर्ड भूपेंद्रनं तोडावे… हीच माझी इच्छा आहे…’ हे वाक्य आहे पंतप्रधान मोदी यांचं! गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नरेंद्र मोदींनी हे विधान केलं होतं. आता प्रत्यक्ष निकाल हाती आले आहे आणि अगदी असंच घडलंय. भाजपनं गुजरातमध्ये विक्रमी जागा जिंकत इतिहास घडवलाय. गुजरातमधला नेमका कोणता रेकॉर्ड भाजपनं मोडला? मोदींचा रेकॉर्ड पटेलांनी कसा मोडला? हेच समजून घ्या…

ADVERTISEMENT

गुजरातमध्ये गेल्या 1995 पासून भाजपची सत्ता आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असायची. पण, यंदा ‘आप’चं आव्हान होतं, तरीही भाजपनं सर्व रेकॉर्ड मोडणार, असं भाजप नेते वारंवार सांगत होते आणि तसंच घडलंही. भाजपनं गुजरातमध्ये आतापर्यंत अनेक निवडणुका नरेंद्र मोदींच्या नावावर लढवल्या. पण, सर्वाधिक जागा जिंकण्याचा रेकॉर्ड काही मोदींना स्वतःच्या नावावर करता आला नाही. हीच भाजपच्या आणि मोदींच्या मनातली सल असल्याचं म्हटलं गेलं.

मोदी मुख्यमंत्री असताना भाजपनं जिंकल्या होत्या सर्वाधिक जागा

केशूभाई पटेल यांच्यानंतर मोदींना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. मोदी आतापर्यंत 2002, 2007 आणि 2012 असे तीनवेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या काळात भाजपनं एकहाती निवडणुका जिंकल्या. 2002 मध्ये दंगलीचा काळ होता. याच काळात झालेल्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या. पक्षाच्या आतापर्यंच्या इतिहासात मिळालेल्या या सर्वाधिक जागा. पण यानंतर भाजपच्या जागा कमीकमी होत गेल्या.

हे वाचलं का?

‘Aam Aadmi Party’ ची राष्ट्रीय राजकारणात दणक्यात एन्ट्री; गुजरात हरुनही मिळणार नवी ओळख

2007 ला 117, 2012 ला 115 जागा… या सर्व निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पण, त्यानंतर 2014 ला मोदी केंद्रात पंतप्रधान म्हणून गेले. 2017 ला ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपला फक्त 99 जागा मिळाल्या. फक्त 99 जागा मिळाल्या असताना यावेळी भाजपचे नेते रेकॉर्ड तोडण्याचा दावा करत होते आणि त्यांचा दावा खरा ठरलाय.

ADVERTISEMENT

माधवराव सोळंकींच्या खाम समीकरणाने काँग्रेसला दिलं होतं ऐतिहासिक यश

भाजपनं त्यांचाच 127 जागांचा मोदींच्या नावावर असलेला रेकॉर्ड तोडला. इतकंच नाही तर सर्वाधिक जागा तोडण्याचा रेकॉर्ड होता, काँग्रेसच्या नावावर! माधवसिंह सोळंकी हे मुख्यमंत्री होते. त्यांनी KHAM हे नवीन सोशल इंजिनिअरिंगचं समीकरण आणलं होतं. KHAM – कोळी, क्षेत्रीय, हरीजन, आदिवासी (जे की गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत), मुसलमान हे सोशल इंजिनिअरिंग केलं होतं.

ADVERTISEMENT

Live : Gujarat, Himachal election results। गुजरातची मोदींना साथ, हिमाचलच्या जनतेचा काँग्रेसला ‘हात’

सोळंकी यांनी 1985 च्या आधी मागासवर्गीय समाजासाठीचं आरक्षण 28 टक्क्यांपर्यंत वाढवलं होतं. राणे कमिशनच्या शिफारशी लागू केल्या. त्यामुळे त्यांना विरोध होऊ लागला. अशातच विधानसभा निवडणुका लागल्या. विरोधात आंदोलन होत असताना, KHAM समीकरण आणि इंदिरा गांधींची हत्या… त्यामुळे काँग्रेसनं गुजरातमध्ये इतिहास रचला. 182 पैकी तब्बल 149 जागा घेऊन काँग्रेस गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली होती.

गुजरात निवडणूक निकालाचा शरद पवारांनी सांगितला राजकीय अर्थ; म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात…’

आतापर्यंत गुजरातमध्ये एखाद्या पक्षाला मिळालेल्या या सर्वाधिक जागा होत्या. पण, आता हा रेकॉर्ड भाजपनं तोडला आहे. भाजपनं तब्बल 156 च्या वर जागा मिळवल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT