Live : Gujarat, Himachal election results। गुजरातची मोदींना साथ, हिमाचलच्या जनतेचा काँग्रेसला ‘हात’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल : भाजप, काँग्रेस आणि आप ने किती जागा जिंकल्या?

182 जागा असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. 107 जागांवरचे निकाल जाहीर झाले असून, भाजपनं 93 जागा जिंकल्या आहेत. 64 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झाले असून, 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीने 3 जागा जिंकल्या असून, 2 जागांवर आघाडीवर आहे. 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, समाजवादी पार्टीने 1 जागा जिंकली आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजपने किती जागा जिंकल्या?

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणूक पार पडली. आतापर्यंत 47 जागांचे निकाल जाहीर झाले असून, 21 जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. 28 जागा काँग्रेसनं जिंकल्या असून, 11 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपने 16 जागा जिंकल्या असून, 10 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे. तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

हे वाचलं का?

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे गुजरातमध्ये भाजपनं पाशवी बहुमत मिळवत सत्तेत वापसी केलीये. गुजरात निवडणुकीत भाजपने 37 जागांवर विजय मिळवला असून, 119 जागांवर आघाडी घेतलेली आहे. 2017 च्या निवडणूक निकालाच्या तुलनेत काँग्रेसची अवस्था दयनीय झालीय. काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला असून, 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टी 5 जागांवर आघाडीवर आहे.

भाजपच्या हातून हिमाचल प्रदेश गेलं…

सत्तेत असलेल्या भाजपचा हिमाचल प्रदेशात पराभव झालाय. हिमाचल प्रदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं गृहराज्य असून, तिथेच भाजपला धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसनं 11 जागांवर विजय मिळवला असून, 28 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपनं 9 जागां जिंकल्या असून, 17 जागांवर आघाडी घेतली आहे. 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, 1 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणूक निकाल अपडेट्स : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमतांचा आकडा केला पार

-काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर

ADVERTISEMENT

-भाजप एका जागेवर विजयी, 27 जागांवर आघाडीवर

-3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

-हिमाचल प्रदेशमध्ये सत्तास्थापनेसाठी 35 जागा आवश्यक

Gujarat: हार्दिक, जिग्नेश, अल्पेश.. गुजरात निवडणुकीत ‘या’ तरुण त्रिकुटाची काय आहे अवस्था?

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल अपडेट्स : भाजप आघाडीवर

-भाजप 149 जागांवर आघाडीवर

-काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर

-आम आदमी पार्टी 8 जागांवर आघाडीवर

-4 अपक्ष आमदार आघाडीवर

-समाजवादी पार्टी 1 जागेवर आघाडीवर

Himachal pradesh election results : काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर, भाजपची जोरदार टक्कर

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट होताना दिसत आहे. मात्र, हिमाचल प्रदेशात काँग्रेसची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर काँग्रेसनं 34 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपकडून काँग्रेसला जोरदार टक्कर दिली जाताना दिसत आहे. भाजप 29 जागांवर आघाडीवर आहे. 4 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असून, आम आदमी पार्टीला खातंही उघडता आलेलं नाही.

Gujarat Election Result 2022 : पाहा गुजरातमध्ये भाजप-काँग्रेस किती जागांवर आघाडीवर

Gujarat Election Resulte : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येताना दिसत आहे. आतापर्यंत पार पडलेल्या मतमोजणीत भाजपनं मोठी मुसंडी घेतली आहे. भाजप तब्बल 156 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बहुमतापेक्षा खूप जास्त जागा भाजपच्या पारड्यात पडताना दिसत आहे. दुसरीकडे गेल्या वेळी भाजपला जोरदार लढत देणाऱ्या काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याचं चित्र आहे. काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 7 जागांवर आघाडीवर आहे. 2 जागांवर अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022 अपडेट्स

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून, सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने शंभराहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप 111 जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर आहे. तर पहिल्यांदाच ताकदीने निवडणूक लढवणारी आम आदमी पार्टी 5 जागांवर आघाडीवर आहे.

Gujarat election result 2022 : गुजरातमध्ये 2017 ला कुणाला किती मिळाल्या होत्या जागा?

2017 मध्ये गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. यावेळी 117 ते 151 जागा जिंकू, असा दावा भाजपकडून सातत्यानं केला जात आहे. गुजरातमध्ये भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. 2002 मध्ये भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 2017 मध्ये 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 16 ते 51 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल : भाजप 135 ते 145 जागा जिंकणार -हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरूवात झाली असून, पक्षाचे नेते हार्दिक पटेल यांनी मोठा दावा केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप 135 ते 145 जागा जिंकेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Gujarat election result 2022 : एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. असं झालं तर गुजरातमध्ये भाजप सातव्यांदा सत्तेत येईल. असं झालं तर भाजप पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाच्या सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या विक्रमांची बरोबरी करेल. पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) पक्ष 1977 ते 2011 पर्यंत म्हणजे 34 वर्षे सत्तेत होता.

Gujarat, Himachal election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात 60.20 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 64.39 टक्के. तर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 75 टक्के मतदान झालं.

Gujarat assembly election 2022 results News : गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार हे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या भाजपने दणदणीत आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तर काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. गुजरातमध्ये आप कडेही लक्ष होतं, मात्र आम आदमी पार्टीची जादू गुजरातमध्ये चालली नाही.

Himachal assembly election 2022 results latest update : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा याच राज्यातून येतात, त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भाजप सत्ता मिळवणार का याची उत्सुकता होती. मात्र, काँग्रेसनं भाजपला जोरदार लढत देत बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणूक निकालाचे अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT