कोरोनामुक्तीचा ‘गुजरात पॅटर्न’ : धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो भाविक रस्त्यावर, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा जनतेला वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. परंतू गुजरातमध्ये या सर्व नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. कोरोनामुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात अहमदाबादमध्ये शेकडो भाविकांची रस्त्यावर गर्दी झाली. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई […]
ADVERTISEMENT
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा जनतेला वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. परंतू गुजरातमध्ये या सर्व नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. कोरोनामुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात अहमदाबादमध्ये शेकडो भाविकांची रस्त्यावर गर्दी झाली. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत २३ जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद तालुक्यातील नवपुरा गावात हा प्रकार ३ मे रोजी घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गावाच्या सरपंचासह २३ जणांना कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत शेकडो महिला आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेला कलश घेऊन बळीयादेव मंदीराकडे जात असताना दिसत आहे. या व्हिडीओत काही व्यक्ती बायकांच्या डोक्यावरचा कलश मंदिरात रिकामा करत असल्याचंही पहायला मिळतंय.
गुजरात के साणंद के मंदिर में हज़ारों लोग जल चढ़ाने के लिए इकट्ठा हुए. सोशल डिस्टेंसिंग और कोरोना प्रोटोकॉल की धज्जियां उड़ाते दिखे लोग. वीडियो वायरल होने के बाद पुलिस हरकत में आई और 23 लोगों को इस मामले में गिरफ़्तार किया. pic.twitter.com/U8hIHeztWG
— The Lallantop (@TheLallantop) May 5, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या मते बळीयादेव मंदीरात पाण्याचा अभिषेक केल्यानंतर कोरोनातून मुक्ती मिळेल. याचसाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. साणंद डिव्हीजनचे DSP के.टी.कामरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सरपंचांसह २३ जणांवर कारवाई केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT