“धनुष्यबाण आम्हालाच मिळेल याची खात्री” गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा फैसला लागू शकतो. धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे यांनीच हक्क सांगितला आहे. तसं पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे. त्यानंतर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्यही समोर आलं आहे. जळगावमध्ये बोलत असताना धनुष्यबाण कायद्याने आमच्याचकडे येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

काय म्हटलं आहे गुलाबराव पाटील यांनी?

“धनुष्यबाण हा लोकप्रतिनिधींची संख्या, संघटनेची पदाधिकाऱ्यांची संख्या, खासदारांची संख्या ही ज्यांच्या बाजूने आहे त्यांनाच मिळेल. एवढंच नाही तर दसरा मेळाव्याच्या गर्दीनेही ही बाब सिद्ध केली आहे. मला तरी वाटतं की धनुष्याबण हे चिन्ह आम्हालाच मिळेल. लोकसंख्येचा आधार, लोकप्रतिनिधींचा आधार आणि जनतेचा पाठिंबा या तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर धनुष्यबाण आम्हालाच मिळायला पाहिजे.”

हे वाचलं का?

धनुष्यबाण गोठवला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे यावर गुलाबराव म्हणाले

धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे. अशीही एक चर्चा सुरू आहे त्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की ही चर्चाही आहेच. पण मला तरी असं वाटतं की धनुष्यबाण आम्हाला मिळेल.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार?

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार? यासाठी म्हणजेच पक्षासाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्याच आधी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण ही निशाणी मिळाली तर तो उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का मानला जाईल. जर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तरीही उद्धव ठाकरेंसाठी धक्का असेल कारण दोन्ही शक्यतांमध्ये नुकसान उद्धव ठाकरेंचंच जास्त होणार आहे.

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर काय?

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांना म्हणजेच ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला प्लान बी तयार ठेवावा लागेल. याचाच अर्थ दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह तयार ठेवावं लागेल. हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा दावा आता दोन्ही गटांनी केला आहे. अशात एका पक्षात दोन गट पडल्याने चिन्ह आणि पक्ष कुणाकडे जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT