शिवकुमार माझ्या मुलीचा खूप छळ करत होता! दीपाली चव्हाण यांच्या आईचा टाहो

मुंबई तक

अमरावतीच्या मेळघाट हरिसाल येथील व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांनी केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांनी वन विभागाच्या क्वार्टर्समध्ये आपल्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडत स्वतःच जिवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. वरिष्ठ अधिकारी DCF विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपालीने आत्महत्या केल्याची तक्रार दीपालीचे पतीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अमरावतीच्या मेळघाट हरिसाल येथील व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांनी केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांनी वन विभागाच्या क्वार्टर्समध्ये आपल्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडत स्वतःच जिवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. वरिष्ठ अधिकारी DCF विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपालीने आत्महत्या केल्याची तक्रार दीपालीचे पतीने पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीवरुन DCF विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्टेशवरुन अमरावती पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

दरम्यान मुलीच्या आत्महत्येची बातमी कळताच दीपाली यांच्या आई शकुंतला चव्हाण यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवकुमार यांनी माझ्या मुलीचा घात केला आहे. रात्री-बेरात्री फोन करुन हा अधिकारी माझ्या मुलीला फोन करुन दारु-मटण आणायला सांगायचा. त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी दीपाली यांच्या आई शकुंतला यांनी केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दीपालीने आपल्याला फोन केला होता आणि यावेळी ती आपल्याला शिवकुमार यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल बोलत होती असंही शकुंतला म्हणाल्या.

RFO दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार: नवनीत राणा

माझी मुलगी मला नेहमी सांगायची की माझा सगळा पगार साहेबाच्या हुजरेगिरीतच जात आहे. तुझ्या औषधाचे पैसे पण माझ्याकडे उरत नाहीत असं दीपाली मला फोनवर सांगायची. आत्महत्या करण्यापूर्वी तिने मला कॉल केला होता…मी तिला असं करु नकोस म्हणून समजावून सांगत होते, पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. या गोष्टीसाठी शिवकुमार हे जबाबदार असल्याचं म्हणत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी दीपाली चव्हाणच्या आईने केली आहे. “आजही अनेक पुरुषांना महिला सक्षम झालेल्या सहन होत नाहीत. आपला पुरुषार्थ दाखवण्यासाठी महिलांवर अशा प्रकारे अत्याचार केले जातात. अशा प्रवृत्तीच्या पुरुष अधिकाऱ्यांनीच माझ्या भाचीचा घात केला असून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहीजे”, अशी मागणी दीपालीची आत्या रजनी पवारने मुंबई तक शी बोलताना दिली.