आमदार असावा तर असा… जनतेसाठी मोडली तब्बल 90 लाखांची FD!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली: सरकारी काम आणि बारा महिने थांब… ही म्हण तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच आपल्यापैखी बहुतेक जण हे सरकारी काम म्हटलं की, नाकं मुरडतात. कारण सरकारी कामाला लागणारा वेळं आणि सध्या कोरोनाच्या काळात सरकारी कारभारचा फटका न बसलेली व्यक्ती ही विरळच असेल. पण याच बिकट परिस्थितीत महाराष्ट्रातल्या एका आमदाराने लोकप्रतिनिधींसाठी वेगळाच आदर्श घालून दिला आहे. त्यासाठी त्यांनी चक्क स्वतःची 90 लाखांची एफडी मोडली आहे.

ADVERTISEMENT

स्वत:ची पदरमोड करुन जनेतची सेवा करणारे हे आहेत शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर. महाराष्ट्रात कोरोनाने घातलेला धुमाकूळ आपण बघतोच आहोत. हिंगोलीत सुध्दा परिस्थिती वेगळी नाही. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आमदार संजय बांगर हे पुढे सरसावले आहेत.

हिंगोलीत रेमेडेसिवीरचा तुटवडा असताना त्यांनी 900 रुपये दराने 500 इंजेक्शन आणले पण नंतर इंजेक्शनचे भाव वाढले आणि बांगरांकडे इंजेक्शन मिळतात कळल्यानंतर त्यांच्याकडे लोकांची रांग लागली.

हे वाचलं का?

27 हजार रेमडेसिवीर येतात, मग जातात कुठे? गुजरात सरकारला हायकोर्टाने झापलं

नंतर जिल्हातल्या इंजेक्शनचा स्टॉक संपल्यानंतर ही इंजेक्शन मागवण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती आणि सरकारी कामासाठी इतकी मोठी रक्कम कशी गुंतवायची असा प्रश्न पडल्याने कोणीही दुकानदार पुढे येईना. कारण सरकारी कामांना होणार विलंब आणि व्याजाचा बसणार भुर्दंड या गोष्टी लक्षात घेऊन अनेकांनी त्याला नकार दिला.

ADVERTISEMENT

तेव्हा संतोष बांगर यांनी स्वतःची 90 लाखांची एफडी मोडून एका खासगी वितरकाला तब्बल 5000 इंजेक्शनची ऑर्डर दिली. आता जेव्हा सरकारी कामाकाजानुसार वितरकाला जेव्हा पैसे मिळतील तेव्हा बांगर यांना त्यांची गुंतवलेली रक्कम परत मिळेल पण तरीही वेळेला स्वतःची पदरमोड करणारा लोकप्रतिनिधी हा विरळच.

ADVERTISEMENT

‘या’ खास कारणामुळे वाढदिवसाच्या दिवशी तिला मुंबई पोलिसांनी पाठवला केक

याबाबत नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी जेव्हा ‘मुंबई तक’ने आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

‘हिंगोली जिल्ह्यासाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन हवे होते. पण हिंगोलीतील प्रशासनासमोर असा प्रश्न उभा राहिला की, या इंजेक्शन्ससाठी लागणारी ही रक्कम तात्काळ कशी उभी करायची? पण त्यावेळी माझ्या खात्यावर एफडी होती 90 लाखांची. ती एफडी मी मोडली आणि ताबडतोब मी आखरे मेडिकल यांच्या खात्यावर RTGS मारलं आणि दोन दिवसात रेमडेसिवीर उपलब्ध झाले. ९६० रेमडेसिवीर आम्हाला शासनाने दिलेले होते. आधी हिंगोलीत एकही रेमडेसिवीर नव्हता. जेव्हा अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी ९६० रेमडेसिवीर दिले. त्यानंतर गरजेनुसार आम्ही रेमडेसिवीर संबंधित रुग्णालयांना दिले आहेत. मात्र आता लवकरच मोठ्या प्रमाणात आपल्याला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे.’ अशी माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली.

हिंगोलीत हा साठा लवकरच पोचेल अशी आशा आहे. पण कोरोनाच्या आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या काळात संतोष बांगर यांचे काम हिंगोलीकरांच्या नक्कीच कायम लक्षात राहील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT