पुणे : एकाच कुटुंबातील सहा जणांना वाहनाने चिरडले; तिघे जागीच ठार, अल्पवयीन मुलांचा समावेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतमध्ये भयंकर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील मुख्य चौकात रस्ता ओलांडणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील सहा जणांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

मृतांमध्ये एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. एक पुरूष व दोन अल्पवयीन मुलं गंभीर जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला नव्हता.

कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत चौकात महामार्गावरून पुणे बाजूकडून सोलापूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील सहा जणांना जोरात धडक दिली.

हे वाचलं का?

भीषण अपघात! दिंडीत घुसला पिकअप ट्रक; 30 वारकरी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर

अपघातात एक महिला, एक अल्पवयीन मुलगा व एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी होऊन जागेवरच गतप्राण झाले. तर एका पुरूषासह एक अल्पवयीन मुलगी व एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अपघातानंतर महामार्गाच्या पाटस टोल प्लाझाच्या रूग्णवाहिकेने प्रथम जखमींना उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर काही वेळात दुसर्‍या रूग्णवाहिकेची व्यवस्था करून तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT