शरद पवारांसोबतच्या भेटीबद्दल अमित शाहांचं महत्वाचं विधान, म्हणाले…
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अहमदाबाद दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीच्या बातम्या समोर आल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा सत्ताबदल होणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दलची बातमी […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अहमदाबाद दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीच्या बातम्या समोर आल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा सत्ताबदल होणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दलची बातमी फेटाळून लावली होती. परंतू India Today शी बोलत असताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल महत्वाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
Can't say what will happen in #Maharashtra after May 2: Home Minister @AmitShah on meeting with Sharad Pawar. pic.twitter.com/utzkLuLh2Z
— Rahul Kanwal (@rahulkanwal) April 3, 2021
काही दिवसांपूर्वी तुमची आणि शरद पवार यांची भेट झाली. २ मे नंतर मुंबईत काय होणार, महाराष्ट्र सरकारला काही धोका आहे का असा प्रश्न विचारला असता अमित शाह म्हणाले, “प्रश्न हा आहे की महाराष्ट्र सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवू शकेल का? माझ्या मते या विषयावर सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. शरद पवार आणि माझ्या बैठकीबद्दल मीडियानेच बातम्या दिल्या त्यामुळे त्याची माहितीही तुमच्याकडेच असेल, माझ्याकडे त्याची काही माहिती नाही.” पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महाराष्ट्रात सरकार बनवेल का असं विचारलं असता अमित शाह यांनी सध्या यावर काहीही बोलता येणार नाही असं सांगितलं.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होते आहे. अचानक महाराष्ट्रात ही वाढ का होते आहे हे महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने सांगू शकतं. पण माझ्या मते केंद्र आणि राज्य सरकारने लवकरच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. आम्ही राज्य सरकारला सर्व मदत करण्यासाठी तयार आहोत असंही शाह यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद, निधी वाटपावरुन काँग्रेस नाराज
पश्चिम बंगाल, केरळ आणि अन्य राज्यांत निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. केरळमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव न करता चांगलं सरकार येण्याची गरज आहे. हे सरकार ना डावे पक्ष देऊ शकत ना काँग्रेस देऊ शकत. भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने चांगलं सरकार देऊ शकतं असं शाह यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT