औरंगाबाद: ‘मुंडकं हातात घेऊन घरातून आले अन् ते आम्हाला दाखवत सुटले…’, आजीने सांगितली ‘ती’ भयंकर घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे-थोरे हिची तिच्या आई आणि भावानेच ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली त्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ही ऑनर किलिंगची अत्यंत भयंकर घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आता एक कंगोरे आता समोर येत आहेत. या संपूर्ण घटनेच्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या अविनाशच्या आजीने ‘मुंबई Tak’शी बोलताना संपूर्ण घटना कथन केली आहे.

ADVERTISEMENT

‘मुंडकं हातात घेऊन घरातून आले अन् ते आम्हाला दाखवत सुटले… त्यावेळी प्रचंड भीती वाटली..’ असं सांगताना अविनाशचा आजीला हुंदका दाटून आला. एखाद्या आईनेच अशाप्रकारे मुलीची हत्या केल्याने अविनाशची आजी देखील घडल्या प्रकाराने जागच्या जागीच थिजून गेल्या.

हे वाचलं का?

अविनाशच्या आजीने सांगितलेली किर्तीच्या हत्येची घटना जशीच्या तशी:

‘मी इकडेच होते.. नातवाचा आवाज आला मला.. काकी-काकी म्हणून.. मी लगेच पळत गेले. मी ती पळत घराजवळ गेले. तर किर्तीचा भाऊ बाहेर आला आणि आम्हाला तिचं मुंडकं हातात धरुन असं दाखवत सुटला आम्हाला. समोरचं दृश्य पाहून आम्ही काहीच बोललो नाही..’ असं सांगत असताना अविनाशची आजी अक्षरश: थरथरत होती. पण नंतर स्वत:ला सावरत त्या पुढे घडलेला प्रकार सांगू लागल्या.

ADVERTISEMENT

‘कोयता घरात राहिला होता त्या पोराच्या हातातला. तर त्याची आई त्याला म्हणाली की, दादा.. कोयता आन म्हणे.. कोयता घेतला आणि लगेच निघून गेले ते..’

ADVERTISEMENT

‘सगळा प्रकार बघून प्रचंड भीती वाटली.. पण समोरचं दृश्य पाहून आम्ही सगळेच मूग गिळून गप्प बसलो. इथे कोणाचाच पत्ता नव्हता.. आम्ही तिघंच होतो. पोरीचं मुंडकं असं दाखवत सुटले तर भीती वाटणार ना..’ असं सांगाताना आजीला पुन्हा एकदा हुंदका दाटून आला.

‘माझ्या नात सुनेचा स्वभाव चांगला होता. तिला काय माहित भेटायला आले म्हणून असं करतील. आधी पण आले होते ते भेटायला.. आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की, असं काही होईल.

पोरीचं मुंडकं हातात घेऊन आम्हाला दाखवत होते.. नंतर भामट्यावानी पळत सुटले. एवढं होऊन पण त्या दोघांच्या डोळ्याचा पाण्याचा एक टिपूस देखील नव्हता.’ यावेळी आजींनी आपला संतापही व्यक्त केला.

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

‘माझा नातू अविनाश त्याची कंबर दुखत होती म्हणून तो झोपलेला होता. त्याआधी तो कोपऱ्यात कांदे खुरपत होता. पण नंतर बरं वाटत नसल्याने तो घरात जाऊन त्याच्या खोलीत झोपला होता. त्यामुळे शेतात ती एकटीच होती ना.. तिला ते येताना दिसले.. मग ती तिकडून घरी आली. तिला वाटलं आले मला भेटायला… त्यामुळे ती शेतातून घरी आली.’

‘त्यानंतर त्यांनी काही टाइमच लागू दिला नाही त्यांनी.. इतक्यात काम केलं तिचं.. अन् निघून गेले. तिला काय माहित की आपल्याला हे लोकं असं करतील म्हणून. असं वाटलंच नव्हतं ना तिला. आता जास्त कधी आलेलेच नव्हते. फक्त तिची आई एकदा येऊन गेली. अन् मागून तिने असं केलं. पोरीचं सगळं रक्त तुंबलेलं आहे तिकडे खोलीत..’ असं सांगताना आजी अक्षरश: आतून मोडून मोडल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं.

या हत्याकांडानंतर मुलीची आई आणि भाऊ पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आत्मसमर्पण करत केलेल्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. तर भाऊ अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायमंडळात पाठविण्यात आलं आहे.

भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’

दरम्यान, अशा घटना या समाजमनावर प्रचंड आघात करतात. आजही महाराष्ट्रात मुलींना त्यांच्या लग्नाबाबत आयुष्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र नसल्याचं दिसून येतं. या घटनेने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यामुळे अशा घटना होऊच नये यासाठी समाजाचं मनपरिवर्तन होणं अधिक गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT