महाराष्ट्रच नव्हे तर ‘या’ राज्यातही बेड्सबाबत गंभीर स्थिती, पाहा एक विशेष रिपोर्ट
मुंबई: कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावेळी कोरोनाची जी लाट आली आहे ती पहिल्यापेक्षा देखील अधिक भयंकर आहे. कारण देशात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सव्वा लाखांहून अधिक नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यात जवळजवळ 60 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहे. अशावेळी महाराष्ट्रात अनेक गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. मुंबईतील […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावेळी कोरोनाची जी लाट आली आहे ती पहिल्यापेक्षा देखील अधिक भयंकर आहे. कारण देशात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सव्वा लाखांहून अधिक नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यात जवळजवळ 60 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहे.
ADVERTISEMENT
अशावेळी महाराष्ट्रात अनेक गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयं ही रुग्णांनी तुडुंब भरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. पण अशी परिस्थिती ही फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाहीए तर देशातील मोठ्या राज्यात देखील तशीच परिस्थिती उद्भवली आहे. जाणून घ्या इतर मुंबईसह इतर राज्यातील बेड्स, व्हेंटिलेटर याचे नेमके अपडेट काय आहेत यावर टाकूयात आपण नजर
मुंबईत झपाट्याने भरतायेत कोविड स्पेशल बेड्स
हे वाचलं का?
मुंबईत सध्या अत्यंत झपाट्याने कोरोना व्हायरस पसरत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा हजार रुग्ण सापडत आहेत. अशावेळी मुंबईत कोरोना रुग्णांसाठी राखीव असणारे बेड्स हे खूप वेगाने भरले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या वेबसाइटनुसार मुंबई सध्या 5171 कोविड स्पेशल बेड्स शिल्लक आहेत. तर 17 हजाराहून अधिक बेड्स भरले आहेत. तर मुंबईत सध्या 58 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. तर सध्या एकट्या मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 80 हजाराहून अधिक आहे.
मुंबईतील कोविड बेड्सच्या अपडेटसाठी इथे क्लिक करा.
ADVERTISEMENT
http://stopcoronavirus.mcgm.gov.in/assets/docs/Dashboard.pdf
ADVERTISEMENT
गुजरातमधील नेमकी परिस्थिती काय?
दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य म्हणजेच गुजरातमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे हेच कारण आहे की, प्रशासनाला रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवावी लागत आहे. अहमदाबाद महापालिकेनुसार पूर्ण जिल्ह्यात 108 रुग्णालयं ही कोविड स्पेशल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर संपूर्ण अहमदाबादमध्ये 2700 कोविड स्पेशल बेड्स वाढविण्यात आले आहेत. सध्या गुजरातमध्ये जवळजवळ 80 टक्के कोविड बेड्स हे भरले आहेत.
6 कोटी लोकसंख्येच्या गुजरातला 1 कोटी लसी आणि 12 कोटी लोकसंख्येला महाराष्ट्राला 1.4 कोटी लसी असा भेदभाव का?
दिल्लीत रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आता सध्या दररोज 5 हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी दिल्लीत देखील बेड्सची चिंता वाढली आहे. एम्सने तर कोरोना संकटामुळे आपल्याकडील ओपीडी सेवा देखील बंद केली आहे.
दिल्ली सरकारच्या वेबसाइटनुसार सध्या इथे फक्त 4585 बेड्सच खाली आहेत. तर 4238 कोविड स्पेशल बेड्स भरले आहेत. जर व्हेंटिलेटरचा विचार केल्यास दिल्लीत सध्या 643 व्हेंटिलेटर बेड भरले आहेत तर 314 बेड्स खाली आहेत.
महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात लसच नाही
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रत जास्त दिसत असली तरीही इतर राज्यात देखील आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर बराच ताण आला आहे. अशावेळी आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देणं गरजेचं असल्याचं दिसतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT