महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात 18 ते 44 वयोगटातील फक्त ‘एवढ्याच’ लोकांना मिळाली लस
मुंबई: कोरोनाला (Corona) आळा घालायचा असल्यास लसीकरण (Vaccination) हा त्यावरील एकमेव उपाय आहे. अशावेळी लवकरात लवकर लसीकरण पार पडणं आवश्यक आहे. मात्र, असं असलं तरी लसीकरणाचा वेग हा फार काही जास्त नसल्याचंच सध्या दिसून येत आहे. त्यातही महाराष्ट्रात जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी लसीकरण वेगानं होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात 18 ते 44 या […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाला (Corona) आळा घालायचा असल्यास लसीकरण (Vaccination) हा त्यावरील एकमेव उपाय आहे. अशावेळी लवकरात लवकर लसीकरण पार पडणं आवश्यक आहे. मात्र, असं असलं तरी लसीकरणाचा वेग हा फार काही जास्त नसल्याचंच सध्या दिसून येत आहे. त्यातही महाराष्ट्रात जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी लसीकरण वेगानं होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात 18 ते 44 या वयोगटातील ( 18 to 44 age group) आतापर्यंत फक्त 4,35,697 जणांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 18 ते 44 या वयोगटातील लोकसंख्या ही जवळजवळ साडेपाच कोटींहून अधिक आहे. त्या तुलनेने गेल्या दहा दिवसात झालेलं लसीकरण हे एक टक्क्याहून देखील कमी आहे.
ADVERTISEMENT
खरं तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सर्व वयोगटातील लोकांना वेगाने लसीकरण होणं गरजेचं आहे. पण असं असलं तरीही सरकारकने अद्याप म्हणावा तसा वेग लसीकरणाबाबत पकडलेला नाही. 18 ते 44 या वयोगटासाठी 1 मेपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण आतापर्यंत संपूर्ण देशात फक्त 20 लाखापर्यंतच लसीकरण होऊ शकलेलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन काल (9 मे) जाहीर केलं आहे की, काल एका दिवसात देशभरात 18 ते 44 वयोगटातील 2.43 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. पण देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास ही आकडेवारी फारच कमी असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचलं का?
Free Vaccination: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लस देणार!
महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील किती लोकांना मिळाली लस:
ADVERTISEMENT
कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग हा देशात महाराष्ट्रात झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील रुग्णांचा आकडा देखील मोठा आहे. अशावेळी महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरु झालं आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील अवघ्या 4,35,697 जणांना लस देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
➡️ More than 2.43 lakh beneficiaries of age group 18-44 vaccinated today.
➡️ More than 20 lakh vaccine doses administered to 18-44 age group till now. pic.twitter.com/EIc5fFPZMO
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 9, 2021
18 ते 44 वयोगट: काही महत्त्वाच्या राज्यात आतापर्यंत किती जणांना देण्यात आली आहे लस?
-
महाराष्ट्र – 18 ते 44 वयोगटातील 4,35,697 जणांना देण्यात आली आहे लस
-
राजस्थान – 18 ते 44 वयोगटातील 3,16,329 जणांना देण्यात आली आहे लस
-
दिल्ली – 18 ते 44 वयोगटातील 3,02,144 जणांना देण्यात आली आहे लस
-
गुजरात – 18 ते 44 वयोगटातील 2,94,669 जणांना देण्यात आली आहे लस
-
हरियाणा – 18 ते 44 वयोगटातील 2,54,689 जणांना देण्यात आली आहे लस
Free Vaccination: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लस देणार!
18 वर्षावरील सर्वांना घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
19 एप्रिल रोजी मोदी सरकारने जाहीर केलं होतं की, 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. कोरोना संकटाच्या काळात ही अत्यंत महत्त्वाची घोषणा होती. भारतातील जास्तीत लोकांना लस देण्यात यावी यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. देशात 1मे पासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या संदर्भात एक बैठक घेतली होती तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता.
25 ते 44 या वयोगटातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राज्य सरकारांनी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या सगळ्यांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT