Omicron Variant : एक संक्रमित रुग्ण 20 जणांना करू शकतो बाधित -डॉ. त्रेहान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड दिल्यानंतर सावरत असलेल्या जगाची कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने भारतासह जगातील अनेक देशात प्रवेश केला असून, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनबद्दल दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टर त्रेहान यांच्याबरोबरच इतर काही डॉक्टरांनी ‘आजतक’शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने हाय रिस्क देशांसोबतची हवाई सेवा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, भारतात आता ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. या व्हेरिएंटबद्दल बोलताना दिल्लीतील मेदांता रुग्णालयाचे संस्थापक डॉ. नरेश त्रेहान म्हणाले, ‘ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेली व्यक्ती इतर 18 ते 20 जणांना बाधित करू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा R नॉट वैल्यू इतर व्हेरिएंटच्या तुलनेत खूप जास्त आहे.’

‘सध्या आपल्याकडे कोरोना लस घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे सुरक्षा मिळू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर त्याला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त माहितीची (डेटा) गरज आहे. व्हेरिएंटमुळे वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी हवाईप्रवासावर प्रतिबंध घालावा लागेल. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही द्यायला हवा. चिंतेची बाब म्हणजे मुलांसाठी आपल्याकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय अजूनही काहीच नाही. त्यामुळे शाळा बंद ठेवू शकतो’, असं डॉ. त्रेहान यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल बोलताना डॉ. अरविंद कुमार ‘या व्हेरिएंटबद्दल दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत जी काही माहिती आली आहे, त्यानुसार या विषाणू संसर्गाची शक्ती खूप असल्याचं जिनोम सिक्वेन्सिग आणि क्लिनीकल चाचण्यांमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे लोकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यायला हवेत.’

बुस्टर डोस द्यायला हवा -डॉ. पारिख

ADVERTISEMENT

दिल्लीतील जसलोक रुग्णालयातील डॉ. राजेश पारिख यांनी बुस्टर डोस देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी बुस्टर डोस देणं आवश्यक असल्याचं पारिख यांनी म्हटलं आहे. दुसरा डोस आणि बुस्टर डोस सोबत द्यायला हवेत असं सांगताना हा व्हेरिएंट 500 पट जास्त वेगाने पसरू शकतो, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर व्हायला हवी…

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. शशांक जोशी यांनी यांनी सांगितलं की, सध्या जो प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे, तो योग्य आहे. पुढील दोन महिन्यांच्या काळात आपण जितक्या सक्तीने चाचण्या करू त्याचा देशाला फायदा होईल. परदेशातून येणाऱ्या लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करून त्यांना 7 दिवस क्वारंटाईन करायला हवं आणि त्यानंतर पुन्हा तपासणी करून 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवायला हवं,’ असं मत डॉ. जोशी यांनी मांडलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT