उद्या उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर शरद पवार-सोनिया गांधींनी त्यांच्या हाताखाली काम करावं: दरेकर
बुलडाणा: ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान (Prime Minister) व्हावे, राष्ट्रपती व्हावे… आमच्या महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठी माणूस झाला तर आम्हाला अभिमान आहे. पण उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान झाले तर शरद पवार (Sharad Pawar) किंवा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उपपंतप्रधान व्हावं किंवा यांच्या हाताखाली मंत्री व्हावं.’ असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर […]
ADVERTISEMENT
बुलडाणा: ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान (Prime Minister) व्हावे, राष्ट्रपती व्हावे… आमच्या महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठी माणूस झाला तर आम्हाला अभिमान आहे. पण उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान झाले तर शरद पवार (Sharad Pawar) किंवा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उपपंतप्रधान व्हावं किंवा यांच्या हाताखाली मंत्री व्हावं.’ असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी नुकतंच आपल्या एका लेखात उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या याच विधानाबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावे, राष्ट्रपती व्हावे… आमच्या महाराष्ट्रातील मराठी माणूस झाला तर आम्हाला अभिमान आहे. पण त्यासाठी केंद्रामध्ये बहुमत असावं लागतं. शिवसेनेची संख्या आज किती आहे याचा विचार करुन आत्मपरिक्षण करुन विधान करावं.’
भेंडीबाजार उल्लेख आला की सगळं पाण्यात; दरेकरांचा पवारांना टोला
हे वाचलं का?
ते पुढे असंही म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास शरद पवार किंवा सोनिया गांधी यांनी उपपंतप्रधान व्हावं किंवा यांच्या हाताखाली मंत्री व्हावं.’ असा उपरोधिक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
प्रवीण दरेकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी सुरू केलेल्या कोव्हिडं केअर सेंटरच्या उदघाटनसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता प्रविण दरेकर यांच्या या टोलेबाजीला शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
“दरेकरांना पाहून कोरोना म्हटला असेल कुठे जॅकिटातून आत शिरू?”
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देखील दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका
दरम्यान, याचवेळी बोलताना दरेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
‘संजय राऊत यांच्याकडून आपलं अपयश आणि आपली अकार्यक्षमता कशी लपवायची हे त्यांच्याकडून शिकावं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हुकमी एक्का नरेंद्र मोदी आहे. हे त्यांनी सांगायची गरज नाही, आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे मराठा आरक्षणा संदर्भात मागणी करू. परंतु आपल्या संविधानामध्ये एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसोबत आपल्याला काम करावं लागतं. परंतु लोकांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे फंडे राज्य सरकारच्यावतीने उपयोगात आणले जात आहेत.’ अशी टीका यावेळी दरेकरांनी केली होती.
सध्या भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. अशावेळी आता राज्य सरकार भाजपलं कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT