Lockdown : अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत…!
पुणे शहरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारपासून हा निर्णय अमलात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे शहरात लागू होत असलेल्या निर्बंधांविषयी माहिती दिली. दरम्यान त्याआधी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबंधिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल आपली नाराजी […]
ADVERTISEMENT
पुणे शहरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारपासून हा निर्णय अमलात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे शहरात लागू होत असलेल्या निर्बंधांविषयी माहिती दिली. दरम्यान त्याआधी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबंधिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. रुग्णसंख्या अवाक्याबाहेर गेली तर अजित पवारांना फोन केला तरीही बेड मिळायचे नाहीत, त्या वेळी काय करणार? अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी आपलं परखड मत नोंदवलं.
ADVERTISEMENT
पुण्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, आणखी कठोर निर्बंधही लागू
“मी सुद्धा लॉकडाउनच्या विरोधात आहे, पण सध्या संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे ते पाहता १०० टक्के हॉस्पिटल ताब्यात घेतली तरीही बेड मिळणार नाही. लोकं ऐकतच नाहीत, कडक निर्बंध घातले तरीही…एखाद्या घरात रुग्ण आढळले तरीही त्या घरातली लोकं गावभर फिरतात. काही उपयोग होत नाही. उद्या मला फोन केला तरीही बेड मिळणार नाही.” अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी शहरातल्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं.
हे वाचलं का?
मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा उंच बिल्डींगमध्ये रुग्णसंख्या जास्त – महापौर किशोरी पेडणेकर
उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला विभागीय आयुक्त, पुण्याचे सर्व लोकप्रतिनीधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्व प्रतिनिधींनी लॉकडाउन नको पण कडक निर्बंध लावा अशी भूमिका घेतली…ज्यामुळे पुण्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला नाही.
ADVERTISEMENT
दरम्यान पुण्यात उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असतील. हॉटेलची पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी ६ नंतर पार्सल सेवा सुरू असणार आहे. पुढील सात दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात दिवसा जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. PMPL ची बससेवाही सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. आढावा बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातले निर्बंध काय आहेत?
खाद्य पदार्थ पुरवणारी केंद्र, रेस्तराँ, बार सात दिवसांसाठी पूर्णतः बंद राहणार. होम डिलिव्हरीची सेवा सुरू राहणारा. मॉल्स, सिनेमा हॉल्स, धार्मिक स्थळं शनिवारपासून बंद
PMPL बसेस शनिवारपासून सात दिवसांसाठी बंद, कॉर्पोरेट कंपन्या, फॅक्टरीज यांसाठीची बससेवा ते पुढील सात दिवस सुरू ठेवू शकतात.
आठवडी बाजार पूर्णपणे बंद
भाजीपाला बाजार, मंडी हे सुरू राहणार पण कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं बंधनकारक
लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कार हे वगळता इतर सगळे समारंभ रद्द लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कार या दोन्हीसाठी मर्यादित संख्या असणं आवश्यक
संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळात कर्फ्यू, अत्यावश्यक सेवांना परवानगी
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT