पुणे : शौचालयाच्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू; शेजारी राहणाऱ्या भाडेकरूनेही गमावला जीव
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली. शौचालयाची टाकी साफ करत असताना वाचवण्याच्या प्रयत्नात टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ग्रामपंचायत सदस्यासह चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दादा पोपट कसबे (वय 45), पद्माकर मारुती वाघमारे (वय 43), कृष्णा दत्ता जाधव (वय 26, रा. देगाव ता. उत्तर सोलापूर सोलापूर) आणि […]
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली. शौचालयाची टाकी साफ करत असताना वाचवण्याच्या प्रयत्नात टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ग्रामपंचायत सदस्यासह चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दादा पोपट कसबे (वय 45), पद्माकर मारुती वाघमारे (वय 43), कृष्णा दत्ता जाधव (वय 26, रा. देगाव ता. उत्तर सोलापूर सोलापूर) आणि रूपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे (वय 45 रा. घोरपडे वस्ती कदम वाक वस्ती मुळगाव केळेवाडी-ता. वाशी. जिल्हा उस्मानाबाद) या चौघांचा समावेश आहे.
लोणी काळभोर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात कदमवाक वस्ती जवळ असलेल्या त्याचा हॉटेलच्या पाठीमागे जय मल्हार कृपा सोसायटीमध्ये शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुवर्ण कांबळे व यश दादा कसबे यांना दिले होते.
बुधवारी सकाळी टाकीची स्वच्छता करत असताना चौघांपैकी कृष्णा जाधव शौचालयाच्या टाकीत पाईप सरकवत असताना तोल जाऊन पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दादा कसबे देखील टाकीत पडले. या दोघांना वाचण्यासाठी सुवर्ण कांबळे हे टाकीत उतरले.









