धक्कादायक, मारबतीच्या विसर्जनानंतर नदीत उतरलेले 4 तरुण बुडाले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

व्यंकटेश दुद्दमवार, गोंदिया

ADVERTISEMENT

गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील काळीमाती या गावातील चार तरुण नदीत वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मारबत घेऊन मानेकसा जवळील वाघनदी येथे विसर्जनासाठी गेले होते. मात्र, यावेळी तरुणांना पाण्यात उतरुन अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी नदी पात्रात पंधरा ते वीस तरुण उतरले. पण अचानक पाण्याचा वेग वाढल्याने एकाच वेळी चार तरुण नदीत वाहून गेले. अद्याप हे चारही तरुण सापडलेले नाहीत. स्थानिक प्रशासनाकडून या चारही युवकांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

नदीत वाहून गेलेल्या चार तरुणांपैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती समजते आहे. संतोष अशोक बहेकार (वय 19 वर्ष), रोहित नंदकिशोर गायकर (वय 18 वर्ष), मयूर अशोक खोब्रागडे (वय 21 वर्ष) आणि सुमित दिलीप शेडे (वय 17 वर्ष) असं वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत.

हे वाचलं का?

पाण्याच्या तुफान प्रवाहामुळे वाहून गेलेल्या चारही तरुणांचा शोध सध्या जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने घेतला जात आहे.

नेमकी घटना काय?

ADVERTISEMENT

काळीमाती गावातील साधारण 15 ते 20 तरुण मंगळवार 7 सप्टेंबर रोजी मारबतची मिरवणूक काढून वाघ नदीच्या काठावर असलेल्या मुंडीपार घाटावर विसर्जनासाठी आले होते. यानंतर युवकांचा गट नदीत आंघोळ करण्यासाठी उतरला. पण पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दोन युवक बुडू लागले पण इतर दोन तरुणही त्यांना वाचवण्यासाठी तेथे पोहचले.

ADVERTISEMENT

मात्र ते देखील पाण्याच्य प्रवाहामुळे आपलं संतुलन राखू शकले नाही आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गोंदिया जिल्हा मदत आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्यांनी बचाव कार्य सुरू केले.

सध्या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नलकुल, आमगाव तहसीलदार दयाराम भोयर, आमगाव पोलीस निरीक्षक विलास नाडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत. अद्यापही ही शोधमोहीम सुरूच झाली आहे. वाहून गेलेल्या चारही तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

नागपूर : पाच युवकांचा नदीत बुडून मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली दुर्घटना

दरम्यान, एकाच गावातील चार तरुण अशा पद्धतीने नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT