Param bir singh : गायब झालेले पोलीस अधिकारी परमबीर सिंह चंदीगढमध्ये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१०० कोटी वसुलीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यासह त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱी परमबीर सिंह (param bir singh) गायब आहेत. अनिल देशमुख आणि परम बीर सिंह यांच्या ठिकाणांबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असून, आता परमबीर सिंह चंदीगढमध्ये तर नाही ना? अशी शंका उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. (Is Param Bir Singh in Chandigarh?)

वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय चांदीवाल आयोग नियुक्त केला आहे. चांदीवाल आयोगाकडून अनेक वेळा सिंह यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र चौकशीकडे सिंह यांनी पाठ फिरवली आहे.

अखेर परमबीर सिंह यांच्यावतीने वरिष्ठ विधिज्ज्ञ अभिनव चंद्रचूड आणि आसिफ लंपवाला हे आयोगासमोर हजर झाले. पावर ऑफ अटर्नीसोबत (परमबीर सिंह यांचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्ती) देण्यात आलेलं प्रतिज्ञापत्र त्यांनी आयोगासमोर सादर केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पावर ऑफ अॅटर्नी चंदीगढमध्ये तयार करण्यात आलेली असून, महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला आयोगासमोर परमबीर सिंह यांचा प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परमबीर सिंह यांचा आयोगासमोर काही सांगण्याचा उद्देश नाही, असंही आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.

‘परमबीर सिंह यांना जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जे सांगितलं गेलं, ते खूप आहे’, असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

परमबीर सिंह हे परदेशात फरार झाले असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. पॉवर ऑफ अॅटर्नीचं ठिकाण चंदीगढ असल्यानं परमबीर सिंह चंदीगढमध्ये आहेत का? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT