जळगावच्या केळ्यांची यंदा ‘दुबई’वारी, तांदळवाडीतील शेतकऱ्याची सातासमुद्रापार झेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगावातील रावेर तालुक्यातील तांदळवाडी या गावातील शेतकरी प्रशांत महाजन यांनी यंदा सातासमुद्रापार झेप घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा प्रामुख्याने केळीचं उत्पादन घेतो. केळीची ही फळं राज्यात आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पाठवली जातात. प्रशांत महाजन यांनी २० मेट्रीक टन केळीचं उत्पन्न दुबईला पाठवलं आहे.

ADVERTISEMENT

तांदळवाडी हे ५ हजार लोकसंख्येचं गाव. या गावातील बहुतांश शेतकरी हे केळीचं पिक घेतात. या गावातील शेतकरी वर्षाकाठी सात ते साडेसात हजार मेट्रीक टन निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेतात. राज्यात आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्ये हा माल स्थानिक शेतकरी पाठवतात. परंतू तांदळवाडीचे प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदाच GI मानांकीत केळींची निर्यात दुबईला केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

हे वाचलं का?

ॲग्रीकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रोडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच ‘अपेडा’ने पुढाकार घेतल्याने आम्हाला जीआय मानांकित केळी दुबईला पाठवता आली. अपेडाने मध्यस्थी करत गुजरातमधील नवसारी येथील देसाई ॲग्री फूड्स नावाच्या कंपनीशी आमचा संवाद साधून दिला. त्यातून 20 मेट्रिक टन जीआय मानांकित केळी ट्रकने मुंबईला व तेथून जेएनपीटी बंदरावरून थेट दुबईला निर्यात करता आली, असे प्रशांत महाजन यांनी सांगितले. हा माल निर्यात झाल्यानंतर महाजन यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT