‘त्या पोलिसांना आई, बहीण, मुलगी नाही का?’, जितेंद्र आव्हाडांची मुंब्रा पोलिसांवर आगपाखड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काही दिवसांपूर्वी कायद्याच्या कचाट्यात अडकले. आधी चित्रपटाचा शो बंद पाडला म्हणून जितेंद्र आव्हाडांना एक रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली. पण, त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याने जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले. जितेंद्र आव्हाडांचा हा राग अजूनही कमी झालेला नाही, असंच दिसतंय. कारण विनयभंगाच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी आता मुंब्रा पोलिसांवरच आगपाखड केलीये.

ADVERTISEMENT

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली होती. मुंब्रा पोलिसांनी तक्रारीवरून जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना जामीनही मिळाला आहे.

विनयभंगाच्या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापलेले आहेत. त्यांचा हा राग पुन्हा एकदा बाहेर आला. शनिवारी मुंब्रा येथे बोलताना जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा पोलिसांवर कठोर शब्दात टीका केली.

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाड यांना दिलासा : विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर

आमदार जितेंद्र आव्हाडांची मुंब्रा पोलिसांवर टीका

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांना रीडची हड्डी राहिलेली नाही. एका माई का लाल पोलीसवाल्यानं ही तक्रार खोटी असून, घेणार नाही, असं सांगितलं नाही. जर उद्या कुणी उठून सांगेल की बलात्कार केला, तर पोलीस ते पण दाखल करतील’, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा पोलिसांवर टीकास्त्र डागलंय.

ADVERTISEMENT

मुंब्रा पोलिसांनी माझ्यावर अन्याय केलाय -जितेंद्र आव्हाड

‘माझ्यावर आणखी कुठलाही गुन्हा दाखल झाला असता तरी चाललं असत, पण मुंब्रा पोलिसांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. माणसाची समाजात एक इज्जत असते. आपल्या मुलीसमोर इज्जत असते. मग ज्या पोलिसांनी माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना आई बहीण मुलगी नाही का?’, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा पोलिसांना केलाय.

ADVERTISEMENT

संजय राऊतांचा संताप! नुपूर शर्मांचा उल्लेख, संभाजी भिडे, शिंदे-फडणवीसांसह विरोध पक्षांनाही सुनावलं

‘कुणीही येऊन काही बोलेल, पण तुम्हाला वर्दी मिळाली आहे. त्या वर्दीचा तर सन्मान ठेवा… कशाला कुणाचे तळवे चाटायला जाता. माझ्या हृदयात अंगार लागली आहे आणि म्हणून मी हे बोलत आहे’, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी विनयभंग प्रकरणी मनातील खदखद व्यक्त केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT