Kalyan: पुरामुळे तडे गेल्याने कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद, नवी अपडेट समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण

ADVERTISEMENT

पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी सोमवारी संध्याकाळपासून बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल 22 वर्ष जूना असून या पुलावरील सर्व वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवली आहे.

मुंबई-आग्रा जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या (PWD) अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाच्या पिलरला तडे गेले नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. तसंच तज्ज्ञांच्या पाहणी आणि त्यांच्या सल्ल्यानंतर पुढील माहिती देऊ. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत मानकर यांनी सांगितले.

हे वाचलं का?

मागील काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल उखळून पडले आहेत. याच पाऊसाच्या पुरमुळे कल्याण-गांधारी पुलाच्या पिलरला तडे गेल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या आहेत.

बंद करण्यात आलेल्या या पुलाचा वापर बापगाव, सोनारे, सावध, लोणार, पडघा, भिवंडी आणि नाशिक दिशेने जाण्यासाठी होतो. पुलावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली. कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या भागात वाहनांची गर्दी झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

चाकरमान्यांना त्यांच्या नोकरीत जाण्यास उशीर होऊ लागले आहेत. पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मंगळवारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यामुळे याबाबत आता लवकरच निर्णय घेतला जाईल.

हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्याचा परिणाम कल्याण शहराच्या वाहतुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. कारण पडघामार्गे नाशिकला जाणाऱ्या अनेक माल वाहतुकीच्या गाड्या या याच पुलावरुन वाहतूक करतात. दुसरीकडे वाहतूक भिवंडीमार्गे वळविण्यात आलेली असली तरी कोनगावनजीक सुरु असलेल्या रस्त्याचं हे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे तिथे आधीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो.

अशावेळी आता गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने हा सगळा भार भिवंडी मार्गावर पडणार आहे. ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Taliye ची दुर्घटना कशी घडली? सगळं गावच डोंगराखाली कसं गाडलं गेलं?

दरम्यान, 2016 साली महाडमधील सावित्री नदीवरील पूल हा रात्रीच्या सुमारास अचानक तुटला होता. मात्र, तरीही त्याबाबत कुणालाही काहीही समजू शकलं नव्हतं. ज्यामध्ये एक एसटी बससह काही गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.

यामुळेच आता गांधारी पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद केला. या पुलाविषयी तज्ज्ञांकडून अहवाल आल्यानंतरच नेमका काय तो निर्णय घेतला जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT