मुंबई-ठाणे परिसरात ४१ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई आणि ठाणे परिसरात तब्बल ४१ घरफोड्यांचे गुन्हे असलेल्या सराईत आरोपीला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नारायण तेवर हा मुळचा तामिळनाडूचा असून तो विविध ठिकाणी फिरत हे गुन्हे करायचा. मागील तीन महिन्यांपूर्वी नारायण एका गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून परतला होता.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी कल्याण कोळसेवाडी परिसरात एका किराणा दुकानामध्ये चोरी झाली होती. कोसळेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना तिकडे मोबाईल आढळून आला. या मोबाईल व परिसररातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोरीचा तपास पोलिसांनी सुरु केला.

नागपूर : ‘त्या’ सहा अर्भकांचं गुढ उकललं, सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला उलगडा

हे वाचलं का?

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आनंदनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. घरफोडीसाठी हा आरोपी एक विशेष प्रकारचं शस्त्र वापरायचा. पोलिसांनी या आरोपीकडून रोख रक्कम, दोन सोन्याच्या अंगठ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. याचसोबत आरोपीकडील सर्व शस्त्रही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

मंदिरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडला, दोन दिवसांनी थेट मृतदेहच सापडला – बीडमधली घटना

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT