कोरोना काळात फेअरवेल पार्टी, मुंबईतील कॉलेजला कारणे दाखवा नोटीस

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक निर्बंधांची घोषणा केली आहे. मात्र अशा परिस्थितीतही मुंबईतील कांदिवली परिसरातील एका ज्युनिअर कॉलेजमधघ्ये सर्व नियम धाब्यावर बसवून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणं अशा अनेक नियमांचं उल्लंघन केलं आहे. ज्यामुळे जितेन मोदी ज्युनिअर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस दाखवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील शाळा, कॉलेज बंद असताना या फेअरवेल पार्टीचं आयोजन का केलं याचं कारण द्यावं अशी नोटीस शिक्षण विभागाने कॉलेजला बजावली आहे. सोशल मीडियावर या फेअरवेल पार्टीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एकीकडे एप्रिल महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार की नाही याबद्दल साशंकता असताना अशा पद्धतीने फेअरवेल पार्टीचं आयोजन करुन कोरोना काळात नियमांचं भंग केल्याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

नागपूर : लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली, शिक्षक बनला ड्रग्ज तस्कर

हे वाचलं का?

“व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचं स्पष्ट दिसतंय, कोणीही मास्क घातलेला दिसत नाहीये. पालक कॉलेज प्रशासनाविरोधात बोलण्यासाठी घाबरत आहेत…कारण त्यांची मुलं बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत.” एका विद्यार्थ्याच्या पालकाने आपली बाजू मांडली.

स्वतःचं अपयश झाकण्यासाठी कोरोनाचा वापर होतोय? मनसेचा सरकारला टोला

ADVERTISEMENT

जितेन मोदी कॉलेजच्या प्रिन्सीपल डॉ. रेश्मा हेगडे यांना याविषयी विचारलं असता त्यांनी आरोप फेटाळून लावले. “आम्ही फेअरवेल पार्टी आयोजित केली नव्हती तो felicitation program होता आणि त्यासाठी आम्ही परवानगी घेतली होती. किमान १०० विद्यार्थी उपस्थित राहतील अशा पद्धतीने आम्ही परवानगी घेतली होती. या कार्यक्रमालाही मोजक्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती आणि यामध्ये सर्व नियमांचं पालन केलं गेलं.”

ADVERTISEMENT

परंतू महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचं या उत्तराने समाधान झालेलं दिसत नाहीये. “आयोजित केलेला कार्यक्रम हा स्पष्टपणे नियमांचं उल्लंघन करुन केल्याचं दिसत आहे. आम्ही स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना याविषयाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग लवकरच ज्युनिअर कॉलेजला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे. कॉलेज प्रशासनाचं उत्तर आल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती शिक्षण विभागाचे उप-संचालक संदीप सांगवे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT