शीख समुदायाबद्दल आक्षेपार्ह ट्विटसंदर्भात मुंबई पोलिसांनी नोंदवला कंगनाचा जबाब
शीख समुदायाविरोधात वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईतल्या खार पोलीस ठाण्यात हजर झाली. या ठिकाणी तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. कंगनाने शीख समुदायाच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. अभिनेत्री कंगनाला 25 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. कंगनाला वाय सिक्युरिटी असल्याने सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तिला घेऊन गेले. कंगनाच्या […]
ADVERTISEMENT
शीख समुदायाविरोधात वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईतल्या खार पोलीस ठाण्यात हजर झाली. या ठिकाणी तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. कंगनाने शीख समुदायाच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता.
ADVERTISEMENT
अभिनेत्री कंगनाला 25 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. कंगनाला वाय सिक्युरिटी असल्याने सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तिला घेऊन गेले. कंगनाच्या विरोधात तक्रार एका शीख संघटनेच्या सदस्यांनी केली होती ज्याने दावा केला होता की कंगनाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांच्या निषेधाला खलिस्तानी चळवळ असे संबोधले होते. त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.
हे वाचलं का?
अमरजीत संधू आणि शीख समुदायातील इतर सदस्य ज्यांनी कंगनाच्या विरोधात तक्रार नोंदवली, त्यांनी खार पोलिस स्टेशन गाठले. तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. संधू म्हणाले, “आम्ही महिलांचा आदर करतो, पण जर तिने आमच्या विरोधात टिप्पणी केली असेल तर तिच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तुलना फुटीरतावादी चळवळीशी केली, जे चुकीचे आहे,” असे संधू म्हणाले. गुरजोत सिंगने आणखी एका तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने या प्रकरणी माफी मागितली पाहिजे.
अमरजीत संधू आणि शीख समुदायातील इतर सदस्य कंगनाने माफी मागावी अन्यथा तिला मुंबईच्या बाहेर काढण्यात यावे अशी मागणीही करत होते. एवढंच नाही तर ती माफी मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे असंही ते म्हणाले. आम्ही तिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर तिनेही आमच्याविरोधात तक्रार दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी संधू यांचा हा दावा खोडून काढला. कंगना पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आली आहे माफी मागण्यासाठी नाही. तिने काही चुकीचं केलंच नाही तर मग माफी कसली मागायची असंही सिद्दीकी यांनी विचारलं आहे. आधी तिच्याविरोधात FIR दाखल करायची आणि मग तिने माफी मागण्याची अपेक्षा करायची याला काय अर्थ आहे असंही सिद्दिकी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT
काय म्हणाली होती कंगना?
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले त्यानंतर कंगनाने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की खलिस्तानी दहशतवादी सरकारला त्रास देत आहेत. मात्र तुम्ही त्या महिलेला विसरू नका ज्या महिला पंतप्रधान व्यक्तीने या सगळ्या खलिस्तान्यांना आपल्या बुटांखाली चिरडलं होतं. असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या फेसबुक पोस्टवर खूप टीका झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT