क्रौर्याची परिसीमा! सिगारेटने जाळला चेहरा, डोळे काढले; बालकावरील अत्याचाराने पोलिसही हादरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विवस्त्र मृतदेह. चेहरा सिगारेटने जाळलेला. डोळे काढून टाकलेले. गळ्याजवळ बुटाचे ठसे… अशा अवस्थेत एका १० वर्षाच्या बालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला आणि त्याच्यावर करण्यात आलेले अमानुष अत्याचार पाहून पोलिसही हादरले. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये. मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

१० वर्षाच्या बालकाची विकृत आणि अमानुषपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलांची अन्ववित आणि हालहाल करून हत्या करण्यात आली. बालकासोबत करण्यात आलेले अत्याचार पाहून पंचनामा करण्यासाठी गेलेल्या अधिकारीही चक्रावून गेले.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटलं, आरोपी अटकेत

हे वाचलं का?

१० वर्षाचा बालक दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून शोध सुरू असतानाच बालकाचा मृतदेह सापडला. हत्या करण्यात आलेल्या बालकाच्या डोळ्याजवळ खिळा सापडला असून, खिळ्याने डोळे काढण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याचबरोबर बालकाचा गळा बुटाने दाबल्याचे निशाणही आढळून आले आहेत.

बालकाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन ग्लास आणि दारूची बाटली सापडली आहे. दोन आरोपींनी दारू पिल्यानंतर बालकाची हालहाल करून हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालकाच्या चेहऱ्यावर सिगारेटने चटके दिल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर आरोपींनी बालकाला फरफट नेल्याचंही संशय आहे. कारण पंचनामा करताना बालकाची पाठ पूर्णपणे काळी पडल्याचं दिसून आलं.

ADVERTISEMENT

Crime: विहिरीत ढकलून जावयाने केली सासूची हत्या

ADVERTISEMENT

बालकावर करण्यात आलेले अत्याचार बघून पोलीस अधीक्षकही हादरले. कानपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अजित कुमार सिन्हा म्हणाले, ‘बालकाचा ज्या पद्धतीने खून करण्यात आला. त्यावरून असं दिसतंय की आरोपींच्या मनात बालकाबद्दल प्रचंड राग होता. आरोपींच्या मनात इतका द्वेष का होता, हे आरोपींना पकडल्यानंतरच कळेल. बालकासोबत झालेले अत्याचार बघून मी सुद्धा हादरलो आहे’, असंही सिन्हा यांनी सांगितलं.

धक्कादायक ! सिगरेट न दिल्याचं निमीत्त, आरोपीने दुकानदाराची गळा चिरुन केली हत्या

बालकाच्या कुटुबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांवर ठपका ठेवला आहे. मुलगा सोमवारी बेपत्ता झाला होता. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेहच मिळाला. या प्रकरणात पोलिसांकडून जे बेजबाबदार वर्तन घडलं आहे, त्याची चौकशी केली जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. या प्रकरणात बालकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT