अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरु
बॉलिवूड अभिनेत्री भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर यांना ब्लड कॅसरचं निदान करण्यात आलं आहे. किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा असल्याचं समोर आलंय. हा एका पद्धतीचा ब्लड कॅन्सर आहे. सध्या किरण खेर यांच्या मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत. View this post on Instagram A post shared by Kirron Kher (@kirronkhermp) किरण खेर यांचे […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर यांना ब्लड कॅसरचं निदान करण्यात आलं आहे. किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा असल्याचं समोर आलंय. हा एका पद्धतीचा ब्लड कॅन्सर आहे. सध्या किरण खेर यांच्या मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
किरण खेर यांचे साथीदार तसंच चंदीगडमधील भाजपचे सदस्य अरुण सूद यांनी बुधवारी एका विशेष पत्रकार परिषद घेत किरणच्या आजाराविषयी माहिती दिली. यावेळी सूद म्हणाले, की किरण खेर गेल्या वर्षापासून उपचार घेत आहे. उपचार घेतल्यानंतर सध्या त्या रिकव्हरीच्या मार्गावर आहेत.
सूद पुढे म्हणाले, गेल्यावर्षी 11 नोव्हेंबरला चंदीगढच्या घऱात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. यावेळी रूग्णालयात उपचार घेतले त्यावेळी त्यांना मल्टीपल मायलोमाची लक्षणं दिसून आली. हा आजार त्यांच्या डाव्य हातापासून उजव्या हाताच्या खांद्यापर्यंत पसरला आहे. यानंतर डिसेंबर 2020 मध्ये त्यांना उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.”
हे वाचलं का?
किरण खेर यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असल्याने पुढील काही दिवस त्या चंदीगढ शहरात येऊ शकणार नाहीत. सूद यांच्या सांगण्यानुसार, “गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना रोज रूग्णालयात उपचारांसाठी जावं लागतं मात्र त्या रूग्णालयात अडमिट नाहीत.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT