गजारुढ अलंकारातील महालक्ष्मीचं लोभस रुप!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री महालक्ष्मीची गजारुढ अलंकार महापूजा करण्यात आली.

हे वाचलं का?

अश्विन शुध्द पंचमी, शारदीय नवरात्रोत्सवाचा दिवस चौथा. रविवारी (10 ऑक्टोबर) जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची गजारुढ अलंकार महापूजेतील रुप.

ADVERTISEMENT

ही महापूजा बांधण्यामागे एक कहाणी आहे.

ADVERTISEMENT

देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवलं होतं.

देवी त्र्यंबोलीने (टेंबलाई) आपल्या चतुराईने कामाक्षाकडील योगदंड काढून घेऊन देवांना पूर्वरुपात आणलं.

कामाक्षाबरोबर युद्ध करून त्याचा वध केला. त्या विजयाप्रित्यर्थ श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मातेनं विजय सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्याचं देवी त्र्यंबोलीला आंमत्रण द्यायचं राहुन गेलं. त्यामुळे देवी त्र्यंबोली रुसून पूर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली होती.

श्री महालक्ष्मीच्या (अंबाबाई) हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी आजच्या ललिता पंचमीच्या दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा गेल्यानंतर दोघींची ह्रदय भेट झाली.

आजची पूजा आई महालक्ष्मी हत्तीवर बसून देवी त्र्यंबोलीला भेटीला जातानाची आहे.

ही पूजा श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT