Kolhapur Flood: कोल्हापूरकरांची भीषण अवस्था, पुणे-बंगळुरु हायवेवर 7 ते 8 फूट पाणी
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर कोल्हापूरजवळील (Kolhapur) पुणे-बंगळुरु हायवेवर (NH-4) अद्याप देखील काही ठिकाणी पाच ते सहा फूट पुराचं पाणी साचल्याचं वृत्त मिळतं आहे. यामुळे पुणे-बंगळुर हायवेवरील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, 23 जुलैपासून सायंकाळपासून अद्यापही हायवे बंद आहे. यामुळे शेकडो वाहनं कर्नाटकजवळ अडकून पडल्या आहेत. कोल्हापूरमधील प्रमुख पंचगंगा नदीची पाणीपातळी ही […]
ADVERTISEMENT
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
कोल्हापूरजवळील (Kolhapur) पुणे-बंगळुरु हायवेवर (NH-4) अद्याप देखील काही ठिकाणी पाच ते सहा फूट पुराचं पाणी साचल्याचं वृत्त मिळतं आहे. यामुळे पुणे-बंगळुर हायवेवरील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, 23 जुलैपासून सायंकाळपासून अद्यापही हायवे बंद आहे. यामुळे शेकडो वाहनं कर्नाटकजवळ अडकून पडल्या आहेत.
कोल्हापूरमधील प्रमुख पंचगंगा नदीची पाणीपातळी ही 23 जुलै रोजी 56 फुटांपर्यंत पोचली होती. मात्र आता पावसाने काहीशी उसंत घेतल्याने आत्ता पंचगंगा नदीची पाणीपातळी 54 फुटपर्यंत खाली आली आहे. पाऊस थांबल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाली आहे.
हे वाचलं का?
खरं तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची धोक्याची पातळी 43 फूट एवढी आहे. त्यामुळे सध्या नदीची पातळी कमी झाली असली तरीही अद्यापही धोक्याचा इशारा देणाऱ्या पातळीपेक्षाही तब्बल 13 फूट अधिक पाणी पातळी कायम आहे. त्यामुळे कोल्हपूरकरांची चिंता कायम आहे. यामुळे कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील 250 हून अधिक गावे पुराच्या पाण्याने बाधित झाले आहेत.
ADVERTISEMENT
मागील तीन दिवस मुसळधार कोसळणारा पावसाने मध्यरात्रीपासून थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुराचं पाणी कमी होऊ लागलं आहे. पण तरीही कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोड, कलेक्टर ऑफिस परिसर, न्यू पॅलेस परिसर, महावीर कॉलेज रोड, या परिसरमध्ये अद्यापही सात ते आठ फूट पाणी आहे.
ADVERTISEMENT
यावेळी कोल्हापूरसह चिखली, आंबेवाडी, शिरोळ या तालुक्यात देखील एनडीआरएफ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने अनेक नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सातत्याने करत आहेत.
दुसरीकडे राधानगरी डॅममधी पाणी हे 96 टक्के भरलं आहे. त्यामुळे जर येथील पाणी पूर्ण क्षमतेने भरलं तर राधानगरी डॅमवरील स्वयंचलित दरवाजे उघडले जातील. तसं झाल्यास मात्र कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडू शकते. कारण हे पाणी थेट पंचगंगा नदीला येऊन मिळतं आणि त्यामुळे शहरात पुन्हा पाणी शिरण्याची भीती कायम आहे.
कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर न्यू पॅलेस, रमणमळा, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, जाधव वाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, कुंभार गल्ली, या सर्व ठिकाणीही ते आठ फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळे सध्या कोल्हापुरातील परिस्थिती ही फारच बिकट असल्याचं दिसून येत आहे.
Kolhapur Flood : पावसाने कोल्हापूरकरांच्या तोंडचं पाणी पळवलं, पिण्याचा पाणीपुरवठा बंद
2019 साली अशाच स्वरुपाचा पूर कोल्हापूरवासियांनी पाहिला आहे. त्याला दोन वर्ष देखील होत नाही तोच पुन्हा एकदा भीषण परिस्थितीला कोल्हापूरकरांना तोंड द्यावं लागत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT