Lakhimpur kheri violence : शेतकरी की पक्षाचे कार्यकर्ते… जीव गमावणारे ते 8 लोक कोण होते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेनं देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं गेलं. यात 8 जण मरण पावले आहेत. ते लोक कोण होते, याबद्दलही आता चर्चा होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

रविवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी तिकुनिया येथे कुस्तीच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जाणार होते. दरम्यान, केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमाचा शेतकरी शांतपणे आंदोलन करत असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याच्या ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि फायरिंग केली. किसान मोर्चानं हा दावा केला आहे.

तर आशिष मिश्रा टेनीने हा आरोप फेटाळून लावला आहे. आमचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्र्यांना घेण्यासाठी जात असताना स्वतःला शेतकरी समजणाऱ्यांनी हल्ला केला’, असं आशिष मिश्रा यांचं म्हणणं आहे. या घटनेचे उत्तर प्रदेशसह देशभरात पडसाद उमटले आहेत.

हे वाचलं का?

रमण कश्यप, दलजित सिंग, गुरविंदर सिंग, लवप्रीत सिंग, छत्र सिंग, शुभम विजय मिश्रा, हरिओम परसेहरा फरधान, श्यामसुंदर बालक राम सिंघ हे यात मरण पावले. या घटनेत मरण पावलेले काही शेतकरी आहेत, तर काही कार्यकर्ते.

घटनेत मरण पावलेले रमण कश्यप हे स्थानिक पत्रकार होते. तर हरिओम मिश्रा हा लखीमपूरमधील भाजपचा कार्यकर्ता होता. त्याचबरोबर अजय मिश्रा याच्याकडे गाडीचालक म्हणून काम करत होता. त्याला चार बहिणी असून, त्याचे वडील शेतकरी आहेत.

ADVERTISEMENT

कचरा दिसताच प्रियंका गांधी यांनी हातात झाडू घेऊन झाडली नजरकैदेची खोली

ADVERTISEMENT

शुभम मिश्रा लखीमपूरमधील गढी येथे भाजपचे बूथ अध्यक्ष होते. त्यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना ६ महिन्यांची एक मुलगीही आहे. घटनेत मरण पावलेले श्यामसुंदर लखीमपूरमधील सिंघावा गावातील भाजपचे कार्यकर्ते आहेत.

Lakhimpur Kheri violence : पोलिसांची गाडी जाळली; उत्तर प्रदेशात संतापाचा उडाला भडका

गुरूविंदर सिंग हे बऱ्याच दिवसांपासून तिकुनियातील कौडियाला साहेब गुरुद्वारात सेवा करतात. गुरुद्वाराजवळच त्यांनी स्वतःचा आश्रम तयार केला होता. त्यांचे वडील शेतकरी आहेत. सुखविंदर सिंगही विविध गुरूद्वारांमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे.

तर दलजित सिंग यापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दलजित सिंग यांच्या आईवडिलांचं सहा महिन्यांपूर्वीच कोविडमुळे मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT