राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी, अवघ्या 30 सेकंदात थांबवलं भाषण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ आणि गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यपाल बोलायला उभे राहिले तेव्हा घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांनी 30 सेकंदात भाषण थांबवलं आणि ते पटलावर ठेवलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात राज्यापालांच्या अभिभाषणाने केली जाते. मात्र राज्यपाल बोलायला उभे राहिले तेव्हा सत्ताधारी पक्षांनी घोषणाबाजी केली.

ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणाला सुरूवात केली. मात्र त्यावेळी राज्यपाल महोदय हे बोलत असतानाच घोषणाबाजी सुरू झाली. आता ही घोषणाबाजी नेमकी कुणी केली? याला दोन बाजू आहेत कारण सत्ताधारी पक्ष म्हणत आहेत की भाजपच्या आमदारांनी अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केली. त्याचा निषेध करून राज्यपाल निघून गेले. त्यांनी राष्ट्रगीत होण्याचीही वाट पाहिली नाही. तर भाजपचं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षांनी घोषणाबाजी केली त्यामुळे राज्यपाल निघून गेले.

राज्यपाल नेमके का निघून गेले? यावरूनही आता आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. विधानसभा अधिवेशन सुरू होण्याच्या आधी भाजपच्या आमदारांनी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या असं म्हणत घोषणाबाजी करून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यानंतर या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत आले. राज्यपालांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात जो काही गदारोळ झाला त्यामुळे त्यांनी भाषण पटलावर ठेवून तिथून जाणं पसंत केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे.

हे वाचलं का?

आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाचं खापर हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर फोडलं आहे. सत्ताधारी पक्षांनी जी घोषणाबाजी केली त्याला कंटाळून राज्यपाल निघून गेले. राष्ट्रगीत घेऊ द्या हेदेखील त्यांना तीनवेळा माईकवरून सांगावं लागलं. तरीही घोषणाबाजी सुरूच होती. सत्ताधारी पक्षांच्या या धोरणामुळे राज्यपाल निघून गेले. त्यांनी अवघ्या काही सेकंदांमध्ये हे भाषण थांबवलं. याची संपूर्ण जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची आहे. अधिवेशन व्यवस्थित पार पडण्यासाठी आणि अशा घटना घडू नयेत याची जबाबदारी सरकारची असते. आपली जबाबदारी पाळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले जयंत पाटील?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र या प्रकरणी भाजपवरच निशाणा साधला आहे. भाजपच्या आमदारांनी अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी सुरू केली. त्याचा निषेध म्हणून राज्यपाल निघून गेले. राष्ट्रगीत होईपर्यंतही ते थांबले नाहीत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघून गेले असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT