फेसबुकवर जमलं प्रेम, लग्नासाठी तरूणीने आग्रह धरल्याने अंगावर ट्रॅक्टर घालून केलं ठार
एका तरूणाची फेसबुकवर एका तरूणीशी ओळख झाली. दोघंही रोज चॅटिंग करू लागले. दोघांमध्ये प्रेमही वाढलं. मात्र तरूणीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा या तरूणाने या तरूणीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला आणि तिला ठार केलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता छडा लावला आहे. त्यामध्ये ही घटना समोर आली आहे. या मुलीचा मृतदेह पोलिसांना चिरडलेल्या अवस्थेत मिळाला होता. […]
ADVERTISEMENT
एका तरूणाची फेसबुकवर एका तरूणीशी ओळख झाली. दोघंही रोज चॅटिंग करू लागले. दोघांमध्ये प्रेमही वाढलं. मात्र तरूणीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा या तरूणाने या तरूणीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला आणि तिला ठार केलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता छडा लावला आहे. त्यामध्ये ही घटना समोर आली आहे. या मुलीचा मृतदेह पोलिसांना चिरडलेल्या अवस्थेत मिळाला होता.
ADVERTISEMENT
ही घटना उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर जिल्ह्यात घडली आहे. 18 फेब्रुवारीला पोलिसांना एका अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला. सुरूवातीला पोलिसांना वाटलं की हा एक अपघाती मृत्यू आहे. मात्र पोलिसांना अधिक तपास केल्यानंतर काही पुरावे घटनास्थळी मिळाले. ज्यामुळे ही हत्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्यांची पथकं तयार केली. त्यानंतर 20 दिवसांतच पोलिसांनी या तरूणीचा प्रियकर आणि त्याच्या भावाला अटक केली.
DSP संजय सिंह यांनी सांगितलं की 18 फेब्रुवारीला आम्हाला एका अज्ञात तरूणीचा मृतदेह रस्त्यावर सापडला होता. त्यानंतर अरविंद पुत्र कुवर लाल यांनी गोकुलपूर ठाण्यात जो बहीण हरवल्याचा रिपोर्ट दिला होता त्यांनी या तरूणीचा फोटो पाहून ती त्यांची बहीण असल्याचं सांगितलं. 3 मार्चला त्यांनी ही ओळख पटवली. त्याने हाच संशय व्यक्त केला होता की अभिमन्यू उर्फ अजित पुत्र कामता ठाकूरने तिची हत्या केली.
हे वाचलं का?
यानंतर पोलिसांनी अभिमन्यू उर्फ अजित आणि त्याचा भाऊ अमित या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. यानंतर अभिमन्यूने सांगितलं की पाच वर्षांपूर्वी आमची फेसबुकवर ओळख झाली होती. आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंधही होते. मात्र माझी प्रेयसी (मृत मुलगी) माझ्यामागे लग्नासाठी तगादा लावत होती. त्यामुळे मी 17 फेब्रुवारीला तिला बांदा जिल्ह्यातील तिंदवारी या ठिकाणी बोलावलं. आपण लग्न करू असं तिला सांगितलं आणि फतेहपूरच्या दिशेने निघालो. त्यानंतर बलीपूर या ठिकाणी ट्रॅक्टर थांबवला आणि ती ट्रॅक्टरच्या खाली उतरली असता तो ट्रॅक्टर तिच्या अंगावर चढवून तिची हत्या केली अशी कबुली त्याने दिली आहे. आम्ही ट्रॅक्टर तिच्या अंगावर चढवला आणि तिथून पळ काढला. ज्या मुलीची हत्या झाली आहे ती दहावीत शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आणि त्याचा भाऊ अशा दोघांनाही अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT