अयोध्येतील महंतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट; अयोध्येला येण्याचंही दिलं निमंत्रण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अयोध्येतल्या हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासदजी महाराज आणि उदासीन आखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवसास्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. यावेळी या दोघांनीही राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचंही निमंत्रण दिलं.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशच्या जनतेने राज ठाकरेंना विरोध करू नये

राज ठाकरे हे प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या जनतेने विरोध दर्शवू नये असंही आवाहन हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी केलं आहे.

राजूदासजी महाराज आणि धर्मदास महाराज यांनी काय म्हटलं आहे?

“आम्ही आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासोबतच अयोध्येला येण्याचंही निमंत्रण दिलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आम्हाला मागे त्यांचा ठरलेला अयोध्या दौरा का रद्द केला याचीही माहिती दिली. तसंच अय़ोध्येला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला मी नक्की येणार असं आश्वासनही आम्हाला राज ठाकरेंनी दिलं आहे असंही या दोघांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.”

हे वाचलं का?

राज ठाकरे अयोध्येला आले तर आनंदच

राज ठाकरे हे अयोध्येला आले तर आम्हाला आनंदच होईल. राज ठाकरे हे प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवण्याचं काहीही कारण नाही असंही आवाहन या दोन्ही महंतांनी केलं आहे.

५ जून २०२२ ला अयोध्या दौरा करणार होते राज ठाकरे

५ जून २०२२ ला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठीची तयारीही जवळपास पूर्ण झाली होती. मात्र २० मे २०२२ ला ट्विट करत राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं की हा दौरा आपण रद्द करत आहोत. त्यानंतर २२ मे २०२२ ला त्यांनी पुण्यात एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याचं कारण समोर ठेवून काही लोकांनी कट आखले होते आणि मला माझ्या मनसैनिकांची जास्त पर्वा आहे प्रसंगी मी त्यांच्या शिव्या खायला तयार आहे पण मी त्यांच्यावर आणखी केसेस झालेल्या किंवा त्यांना काही इजा झालेली सहन करू शकत नाही असं म्हणत दौरा रद्द करण्याचं कारणही आपल्या भाषणातून सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

आता आज दोन महंतांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी मी नक्की येणार असं राज यांनी या दोन्ही महंतांना आश्वस्त केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे नेमकं अयोध्येला कधी जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT