महाराष्ट्राला Oxygen, Remdesivir आणि लसींचा पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दररोज रूग्णसंख्या 60 ते 65 हजारांच्या घरात वाढते आहे अशात राज्याला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसींचा पुरवठा वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशाशी संवाद साधला.

कोरोनाची लढाई आपण सगळ्यांनी एकजुटीने लढूया, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय राज्यांनी ठेवावा असं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावावा लागला असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं.

महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपल्या देशातील कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरीही आम्ही अर्थचक्राला झळ बसणार नाही याचीही काळजी घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं.

महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळावा म्हणून केंद्र सरकारचे पाय धरायलाही तयार -राजेश टोपे

ADVERTISEMENT

रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवावा

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला जास्त ऑक्सिजनची गरज आहे, त्याचप्रमाणे रेमडेसिवीरचाही पुरेसा पुरवठा आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लांटच्या जागी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला देण्यात यावा अशीही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

आजच्या बैठकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटनच्या लसीकरणाचंही उदाहरण दिलं. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग थांबवण्यास मोठी मदत झाली. आपल्या देशात सध्या लस उत्पादक कंपन्यांची संख्या मार्यादीत आहे. त्यामुळेच इतर देशांमधून उत्पादन होणाऱ्या लसी आम्ही आयात करून लसीकरणाची मोहीम वेगाने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावं असंही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं.

1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?

विषाणूच्या डबल म्युटेशनचा अभ्यास आवश्यक

राज्यात विषाणूचे डबल म्युटेशन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कोव्हिड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार

आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT