साताऱ्यात थरकाप उडवणारी घटना! किरकोळ भांडणातून तरूणाला उकळत्या चुन्यामध्ये ढकललं
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा किरकोळ वादातून एका तरूणाला उकळत्या चुन्यामध्ये ढकलल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला आधी बेदम चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकलण्यात आलं. सातारा शहरातील रविवार पेठ भागात ही घटना घडली आहे. सातारा पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून ही धक्कादायक […]
ADVERTISEMENT
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
किरकोळ वादातून एका तरूणाला उकळत्या चुन्यामध्ये ढकलल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला आधी बेदम चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकलण्यात आलं. सातारा शहरातील रविवार पेठ भागात ही घटना घडली आहे. सातारा पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून ही धक्कादायक घटना घडली अशी माहिती समोर आली आहे.
मारहाण करणाऱ्या युवकाला शरीरावर चटके बसले आहेत. साताऱा जिल्हा रूग्णालयात त्यावच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू प्यायले होते असं तक्रारदार यांचे सांगणे आहे.या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. साताऱ्यात रविवार पेठेत परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकललं. नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी ही मारहाण केली.
हे वाचलं का?
मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजले आहे. क्षुल्लक कारणातून ही मारहाण झाल्याची बाब समोर येत आहे. त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
ADVERTISEMENT
रविवार पेठ या ठिकाणी चुना गरम केला जातो. त्याच ठिकाणी तरूणाला एका दारू प्यायलेल्या माणसाने मारहाण करून चुन्याच्या निवळीत ढकललं. या प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत. या घटनेत तरूणाचा हात नऊ टक्के भाजला आहे. पीडित तरूणाचा जबाब घेतला जाऊन त्यानंतर आरोपीवर आम्ही कारवाई करणार आहोत. ज्या तरूणावर हल्ला झालं त्याचं वय 29 वर्षे आहे असंही सातारा पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मला काहीही कारण नसताना नितीन सोडमसेने मला मारहाण केली आहे. नितीन सोडमसेने दारू पिऊन हे कृत्य केलं. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हे प्रकार या ठिकाणी वारंवार होत आहेत. मलाच नाही तर इतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनाही त्रास दिला जातो आहे असं समाधान मोरे या पीडित तरूणाने मुंबई तकशी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT