महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजारांहून Corona रूग्णांना डिस्चार्ज, 190 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजार 124 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 60 लाख 75 हजार 888 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.59 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 7 हजार 242 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज दिवसभरात 190 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 75 लाख 59 हजार 938 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 90 हजार 156 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 87 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 78 हजार 562 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 7,242 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,90,136 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

आज राज्यातील बाधित रुग्णांचे 10 जुलै पर्यंतच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमध्ये रुग्णांच्या रहिवाशी पत्यानुसर जिल्हा अंतर्गत शिफ्टिंग करण्यात आले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांच्या एकूण रुग्ण संख्येत बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत काही बदल झालेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

ADVERTISEMENT

आजच आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत असा निर्णय झाला आहे. या निर्णयाबाबत सरकार सकारात्मक आहे असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. राजेश टोपे यांना केरळमध्ये वाढलेल्या रूग्णसंख्येबाबत आणि तिसऱ्या लाटेबाबत प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले केरळमध्ये रूग्णसंख्या वाढली ही चिंतेची बाब नक्कीच आहे. तिथे तिसरी लाट सुरू झाली असण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रात तशी स्थिती नाही. मात्र तिसरी लाट आली तर ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, बालरोग तज्ज्ञांची टीम आणि सुसज्ज आरोग्य व्यवस्था अशी आपली सगळी तयारी झाली आहे. तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पण तिसरी लाट आलीच तर त्या लाटेला लढा देण्यासाठी आपण सज्ज आहोत असंही राजेश टोपेंनी सांगितलं

ADVERTISEMENT

आज 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं राजेश टोपे यांनी सांगितलं असलं तरीही उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध म्हणजेच जे आत्ता सुरू आहेत ते निर्बंध कायम राहतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध?

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या अकरा जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध असतील. जर गरज पडली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने निर्बंध कडक करण्याची गरज असेल तर तसंही करा अशा सूचना देण्यात आले आहेत. लग्न किंवा समारंभ याबाबत काही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी सगळी यादी सांगणार नाही. मात्र टास्क फोर्स आणि आम्ही शिफारस केली आहे. याबाबत आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT