संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरीचा प्रश्नच नाही-दिलीप वळसे पाटील
संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा त्यांची हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे यांनी तीन दिवसांपूर्वीच आक्रमक पवित्रा घेत सरकारला 6 जूनपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. अशात आजच त्यांनी सरकारवर एक आरोप केला होता. हा आरोप होता तो म्हणजे हेरगिरीचा. […]
ADVERTISEMENT
संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा त्यांची हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे यांनी तीन दिवसांपूर्वीच आक्रमक पवित्रा घेत सरकारला 6 जूनपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. अशात आजच त्यांनी सरकारवर एक आरोप केला होता. हा आरोप होता तो म्हणजे हेरगिरीचा. माझ्यावर पाळत ठेवली जाते आहे.. सरकार हेरगिरी करतं आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं होतं. मात्र याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरीचा प्रश्नच उद्भवत नाही असं आता वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सरकार माझ्यावर पाळत ठेवतं आहे-संभाजीराजे छत्रपती
सरकार माझ्यावर पाळत ठेवतं आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश मला माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाही की माझ्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असं ट्विट करत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संभाजीराजे छत्रपती यांनी हा आरोप केला आहे. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश नेमका कोणत्या सरकारकडे आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी हा आरोप केला आहे की मोदी सरकारवर हा आरोप केला आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी याप्रश्नी स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे त्यांचा रोख राज्य सरकारकडे होता हे आता स्पष्ट झालं आहे.
हे वाचलं का?
दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटलं आहे?
संभाजीराजे छत्रपती यांच्यावर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा झाली आहे. आमच्या चर्चेनंतर त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झाला आहे असं ट्विट वळसे पाटील यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.@YuvrajSambhaji pic.twitter.com/hePs7QxTtJ
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) May 31, 2021
संभाजीराजेंना विषय संपवला..
ADVERTISEMENT
दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिल्यानंतर संभाजीराजेंनीही नवं ट्विट केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आत्ताच मला फोन केला होता. कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतू त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता हे त्यांनी मला सांगितलं. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मीदेखील त्यांच्या वक्तव्यावर समाधानी आहे. आता हा विषय संपला आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता.
त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली.
परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता.
माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे.
(१/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT