‘मोदींचे हात आणि तोंड नेहरूंनी बांधून ठेवलंय का?’ मुनगंटीवारांना तोंडाळ मंत्री म्हणत ठाकरे संतापले
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून वर आलाय. हा प्रश्न ऐरणीवर येण्याचं कारण ठरलं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं विधान. जत, अक्कलकोटवर कर्नाटक दावा ठोकणार, असं बोम्मई म्हणालेत. त्यावरून उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात मोदींच्या मध्यस्थीचा दाखला देत ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत. बसवराज बोम्मईंच्या विधानानं महाराष्ट्रातलं […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून वर आलाय. हा प्रश्न ऐरणीवर येण्याचं कारण ठरलं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं विधान. जत, अक्कलकोटवर कर्नाटक दावा ठोकणार, असं बोम्मई म्हणालेत. त्यावरून उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात मोदींच्या मध्यस्थीचा दाखला देत ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत.
बसवराज बोम्मईंच्या विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलं असून, भाजपसह एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य करण्यात आलंय.
सामना अग्रलेखात म्हटलंय, “राज्यात कमजोर, अशक्त, बेकायदेशीर ‘खोके’ सरकार आल्यापासून इतर राज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले सुरू केले. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत”, असा टोला शिंदेंना लगावला आहे.
बेळगाव, निपाणी, कारवार हा आमचाच भाग : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचं उत्तर









