आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडणारे सुनील शिंदे कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या ६ सदस्यांपैकी रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप यांच्या सदस्यपदाचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे.

हे वाचलं का?

त्यामुळे रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळणार की दुसऱ्याला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र, व्हायरल झालेल्या तथाकथित व्हायरल क्लिपमुळे रामदास कदमांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेनं माजी आमदार सुनील शिंदे यांना संधी दिली आहे. सुनील शिंदे यांनी विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदरासंघ सोडला होता. अखेर त्यांना पक्ष निष्ठेचं फळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. 2007 मध्ये ते बृहन्मुंबई महापालिकेत निवडून आले होते.

बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यांना विधानसभा निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळाली होती.

2015 मध्ये सुनील शिंदे यांच्यावर शिवसेनेनं उत्तर अहमदनगर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी जबाबदारी सोपवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला. आदित्या ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती.

वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर सुनील शिंदे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामावर लक्ष्य देण्यास सुरूवात केली होती. त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT