महाराष्ट्र सरकारकडून माजी पंतप्रधान Rajeev Gandhi यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारने पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलत भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं. या निर्णयावरुन देशभरात सध्या राजकारण सुरु आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राजीव गांधी यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयात चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

ADVERTISEMENT

माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजीव गांधीच्या नावाने नवीन पुरस्कार घोषित करत केंद्राला प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जातंय.

Khel Ratna Award : खेलरत्न पुरस्कार आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार

हे वाचलं का?

४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका करत काँग्रेस नेत्यांनी क्रिकेटच्या मैदानाला नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांचं नाव काढून टाकण्याची मागणी केली होती. भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती.

‘खेलरत्न पुरस्काराचे नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’, ‘सामना’तून PM मोदींवर टीकेची झोड

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT