Lockdown मध्ये फिरण्याचे बेत आखणाऱ्या ‘वल्लीं’साठी पोलिसांनी पोस्ट केला पुलंचा व्हीडिओ
कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढतो आहे. त्यामुळे आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तरीही काहीतरी कारण काढून घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आता महाराष्ट्र पोलिसांनी पु.ल. देशपांडे यांचा व्हीडिओ शेअर केला आहे. किमान यांचं तरी ऐका अशी अपेक्षा आता पोलिसांनी अकारण बाहेर भटकणाऱ्यांकडून ठेवली आहे. लॉकडाऊन च्या काळात आवश्यकता नसताना बाहेरगावी फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या महत्वाकांक्षी […]
ADVERTISEMENT
कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढतो आहे. त्यामुळे आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तरीही काहीतरी कारण काढून घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आता महाराष्ट्र पोलिसांनी पु.ल. देशपांडे यांचा व्हीडिओ शेअर केला आहे. किमान यांचं तरी ऐका अशी अपेक्षा आता पोलिसांनी अकारण बाहेर भटकणाऱ्यांकडून ठेवली आहे.
ADVERTISEMENT
लॉकडाऊन च्या काळात आवश्यकता नसताना बाहेरगावी फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या महत्वाकांक्षी 'वल्लींना', जबाबदार नागरिक हेच म्हणतात: pic.twitter.com/MLKvNJQEw1
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 7, 2021
मुंबई पोलीस हे आपल्या हटके ट्विटमुळे कायम चर्चेत असतात. अशात आता महाराष्ट्र पोलिसांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक हटके व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण हा व्हीडिओ आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल.देशपांडे यांचा.
‘या’ खास कारणामुळे वाढदिवसाच्या दिवशी तिला मुंबई पोलिसांनी पाठवला केक
हे वाचलं का?
काय आहे व्हीडिओ क्लिपमध्ये?
हा व्हीडिओ पु.ल. देशपांडे यांच्या तुम्हाला कोण व्हायचं आहे मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर या कथाकथनातला आहे. त्यातला सात सेकंदाचा भाग महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केला आहे. या व्हीडिओत पु.ल. म्हणतात.. ‘त्यापेक्षा तुम्ही असाल त्या गावी सुखी राहा, आयुष्यात सगळ्याच महत्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत’ हे पुलंचं वाक्य असलेला व्हीडिओ महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केला आहे. या ट्विटला अनेक रिट्विट मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आवश्यकता नसताना बाहेरगावी फिऱण्याचे प्लान बनवणाऱ्यांना वल्लींना जबाबदार नागरिक हेच म्हणतात असं वाक्य लिहून हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी असंच मुंबई पोलिसांचं एक हटके ट्विटही चांगलंच चर्चेत आलं होतं. वाढदिवस असल्याने पार्टी मागणाऱ्या एका महिलेने लॉकडाऊन आहे घरात राहा, सुरक्षित राहा असं उत्तर तिच्या मित्र-मैत्रिणींना दिलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्या महिलेला केक पाठवला होता. ज्यानंतर या महिलेने मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या केकचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पिन टू टॉप करून ठेवला होता आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले होते. जबाबदार नागरिक असं लिहून हा केक मुंबई पोलिसांनी या महिलेला पाठवला होता. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं हे ट्विटही चांगलंच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT