केवळ तीन युक्तिवादांमध्ये उद्धव ठाकरेंना मैदान मिळवून देणारे अस्पी चिनॉय कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेत वेगळा गट बनवला. त्यानंतर शिंदेंनी आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा अनेकांना सोबत घेतले. अशात शिंदे यांनी शिवसेना पक्षावरही दावा केला. हा दावा सध्या न्यायालयात सुरु असतानाच दुसरी लढाई सुरु झाली ती दसरा मेळाव्यासाठी आणि शिवतीर्थसाठी. शिवाजी पार्कचा वाद आधी महापालिकेकडून सुटला नाही म्हणून थेट शिवसेनेने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान दिले.

ADVERTISEMENT

या आव्हानाविरोधातही शिंदे गटाकडूनही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे एकीकडे ठाकरेंचा अर्ज, दुसरीकडे पालिकेचा अर्ज तर तिसरीकडे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरांची हस्तक्षेप याचिका. 23 सप्टेंबरला दसरा मेळाव्यासाठी मैदान कोणाला? यावर सुनावणी सुरु झाली. तिन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. सुरुवातीला सदा सरवणकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. इथेच शिंदे गटाला पहिला धक्का बसला आणि शिवसेनेला आशेचा किरण दिसू लागला.

नंतर महापालिकेने परवानगी नाकारकताना कायदा आणि सुव्यवस्थेचे सांगितलेल्या कारणालाही न्यायालयाने योग्य ठरवले. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरुन महापालिका एका सभेसाठी परवानगी नाकारू शकत नाही, पालिकेने परवानगी देण्याच्या आधिकाराचा गैरवापर केला, असे म्हणतं न्यायालयाने महापालिकेलाही फटकारले. इथे महापालिकेला दणका बसला आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण या सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे न्यायालयात ठाकरेंची बाजू लढणारे वकील अस्पी चिनॉय यांचा युक्तिवाद.

हे वाचलं का?

सगळ्यात आधी न्यायालयाने विचारले, मैदानासाठी पहिला अर्ज कोणी केला होता. त्यावेळी वकील चिनॉय यांनी सांगितले शिवसेनेकडून 22 आणि 26 ऑगस्ट रोजी अर्ज करण्यात आला होता. तर सदा सरवणकरांनी 30 ऑगस्टला अर्ज केल्याचे चिनॉय यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हे सगळे सुरु असताना न्यायालयाने याआधी आलेल्या अशा खटल्यांचा आढावाही घेतला. सर्व युक्तिवादानंतर विजय उद्धव ठाकरेंचा झाला. मात्र खरा विजय खेचून आणला तो वकील अस्पी चिनॉय यांनी आणि त्यांच्या तीन युक्तिवादने. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो, की कोण आहेत अस्पी चिनॉय.

कोण आहेत अस्पी चिनॉय :

  • मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण

ADVERTISEMENT

  • शिक्षणानंतर मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस

  • ADVERTISEMENT

  • १९७७ पासून मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च न्यायालयांमध्ये प्रॅक्टिसला सुरुवात

  • संवैधानिक, व्यावसायिक, जनहित याचिका लढवण्याचा चिनॉय यांचा हातखंडा

  • घटनात्मक/प्रशासकीय कायद्याच्या प्रकरणात निष्णात

  • लंडन, सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादांमध्ये सहभाग

  • ठाकरेंच्या ज्या मुद्द्याला शिंदेंनी मुद्द्याने उत्तर द्यायचे ठरवले होते, तोच मुद्दा न्यायालयाने खोडून काढत, ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी मैदान दिले आहे. मात्र या सगळ्यात वकील अस्पी चिनॉय यांनी मांडलेले मुद्देही तितकेच महत्त्वाचे ठरले.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT