महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 360 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजार 910 रूग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 31 हजार 737 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात Recovery Rate 95.48 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 10 हजार 697 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 360 मृत्यूंची […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजार 910 रूग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 31 हजार 737 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात Recovery Rate 95.48 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 10 हजार 697 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 360 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.84 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 78 लाख 34 हजार 54 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 98 हजार 550 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 63 हजार 227 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 5 हजार 807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
Black Fungus वरचं औषध टॅक्स फ्री, Corona Vaccine वर पाच टक्के GST कायम
हे वाचलं का?
राज्यात आज घडीला 1 लाख 55 हजार 474 Active रूग्ण आहेत. आज राज्यात 10,697 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 58,98,550 इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 360 मृत्यूंपैकी 239 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 121 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 1606 ने वाढली आहे. हे 1606 मृत्यू, नाशिक-315, नागपूर-276, पुणे-230, सातारा-149, अहमदनगर-138, ठाणे-126, सांगली-41, जालना-36, रत्नागिरी-34, धुळे-30, नांदेड-29, बुलढाणा-28, पालघर-27, लातूर-19, रायगड-19, सोलापूर-16, यवतमाळ-13, चंद्रपूर-12, औरंगाबाद-11, गोंदिया-9, जळगाव-8, परभणी-8, वर्धा-7, बीड-6, उस्मानाबाद-6, कोल्हापूर-5, सिंधुदुर्ग-3, अकोला-2, अमरावती-2 आणि भंडारा-1 असे आहेत.
ADVERTISEMENT
Amruta Fadnavis यांनी घेतली Corona Vaccine, फोटो पोस्ट केल्यानंतर लोक म्हणाले…
ADVERTISEMENT
10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्णसंख्या असलेले जिल्हे
मुंबई 18 हजार 65
ठाणे- 15 हजार 801
पुणे- 18 हजार 350
सातारा- 10 हजार 110
सांगली- 10 हजार 314
कोल्हापूर- 16 हजार 520
महाराष्ट्रातल्या या सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे असंही अहवालात नमुद केलेल्या संख्येवरून कळतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT