महाराष्ट्रातील मृतांचा आकडा देखील वाढला, गेल्या 24 तासात किती नवे कोरोना रुग्ण सापडले
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होत नसताना आता प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. कारण आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा देखील वाढला आहे. कारण आज (7 एप्रिल) राज्यात तब्बल 376 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मागील 24 तासात राज्यात 56 हजार 286 नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होत नसताना आता प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. कारण आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा देखील वाढला आहे. कारण आज (7 एप्रिल) राज्यात तब्बल 376 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मागील 24 तासात राज्यात 56 हजार 286 नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे सध्या राज्यात 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (maharashtra reports 56286 new corona cases and 376 deaths in 8 april 2021)
ADVERTISEMENT
ठाकरे सरकारने राज्यात 5 एप्रिपासून 30 एप्रिलपर्यंत अत्यंत कठोर निर्बंध म्हणजे जवळजवळ लॉकडाऊनच लागू केलं आहे. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तर इतर आस्थापने मात्र बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने बरीच चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यात आज 36,130 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 26,49,757 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.05 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 376 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.77 टक्के एवढा आहे.
हे वाचलं का?
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,13,85,551 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32,29,547 (15.10 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,02,613 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,661 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 5,21,317 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
ADVERTISEMENT
-
मुंबई – 83 हजार 693
ADVERTISEMENT
ठाणे- 69 हजार 993
पुणे- 97 हजार 242
नागपूर- 61 हजार 711
नाशिक- 34 हजार 919
अहमदनगर- 15 हजार 292
जळगाव- 8 हजार 212
औरंगाबाद- 18 हजार 082
लातूर – 9 हजार 355
नांदेड- 11 हजार 659
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबई पाठोपाठ पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 97 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात 61 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईत दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 8 हजार 938 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4 हजार 503 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 92 हजार 514 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 80 टक्के आहे. डबलिंग रेट 33 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT