लाल एसटी ते शिवशाही.. एसटीचा चित्तवेधक इतिहास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

साधी एसटी बस – 1999 साली सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करुन साधी बस तयार करण्यात आली. पण यामध्ये देखील प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा अशी व्यवस्था एसटी महामंडळाने केली होती.

हे वाचलं का?

मिनी आणि मिडी बस – 2002 साली कमी अंतरासाठी 20 आसनी मिनी बस सुरु करण्यात आली होती. तसेच 32 आसनी मिडी बस देखील सुरु केली होती.

ADVERTISEMENT

शिवनेरी-एसटी महामंडळाची सर्वाधिक चर्चेत असलेली बस ही शिवनेरी ठरली होती. जी 2002 साली सुरु करण्यात आली होती. मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली ही खास बस सुरु करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

परिवर्तन बस – 2005 साली आकर्षक पद्धतीने एसटीने एक नवी बस तयार केली. ज्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. याच बसला परिवर्तन बस असं म्हणतात.

सीएनजी बस – 2009 साली प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी एसटीने आपल्या ताफ्यात सीएनजी बसेस आणल्या.

स्कूल बस- 2012 साली शासनाने 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत बस सेवा देण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा बस -2015 साली शासनाने नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी विशेष बस सोडल्या होत्या. हरित कुंभमेळा या संकल्पनेवरुन या बसेसना आकर्षक हिरवी रंगसंगती करण्यात आली होती.

पुशबॅक हिरकणी – 2013 साली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एशियाड बसचे हिरकणी असे नामकरण करण्यात आले होते. याच बसमधील आरामदायक प्रवासासाठी पुशबॅक आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

शिवशाही – 2017 साली एसटी महामंडळाने माफक दरात वातानूकुलित एसटी सेवा सुरु केली. ज्याला शिवशाही असं नाव देण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT