Maharashtra Unlock : उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढणार; अम्युझमेंट पार्कही होणार सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत राज्य सरकार नंतर निर्णय घेणार आहे. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.

बैठकीत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे’, असं सांगत उपहारगृहे आणि दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.

हे वाचलं का?

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला यावेळी केल्या.

मुंबईच्या कोरोनाविरोधी लढ्याला बळ देणारी बातमी! 18 महिन्यांनंतर शून्य मृत्यूची नोंद

ADVERTISEMENT

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.

ADVERTISEMENT

कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Unlock : एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर कुठेही फिरता येणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुंबई महापालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. खुसराव्ह, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT