Maharashtra Unlock : राज्यातले सगळे जिल्हे आता लेव्हल थ्रीमध्ये, सरकारने नियमावलीत महत्त्वाचे बदल
महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाच टप्प्यांमध्ये Lockdown चे निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र मागील दोन-तीन आठवड्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये काहीशी वाढ झाली आहे असं दिसून येतं आहे. त्यापाठोपाठ डेल्टा प्लस व्हेरिएंटनेही काळजी वाढवली आहे. आजच रत्नागिरीच्या एका महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचे निर्बंध कठोर करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. महाराष्ट्रात 4 […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाच टप्प्यांमध्ये Lockdown चे निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र मागील दोन-तीन आठवड्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये काहीशी वाढ झाली आहे असं दिसून येतं आहे. त्यापाठोपाठ डेल्टा प्लस व्हेरिएंटनेही काळजी वाढवली आहे. आजच रत्नागिरीच्या एका महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचे निर्बंध कठोर करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 4 जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीत पाच गटांमध्ये जिल्हे आणि महापालिकांची विभआगणी करण्यात आली होती. जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारे ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट असं सगळं लक्षात घेऊन अनलॉक पाच टप्प्यांमध्ये करायचा असं ठरवण्यात आलं. तसंच अंतिम निर्णय जिल्हाधिकारी किंवा महापालिका यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र आता आज जे बदल जाहीर करण्यात आले आहेत त्यानुसार पॉझिटिव्हिटी रेट, बेड ऑक्युपन्सी रेट यांचं प्रमाण कितीही असलं तरीही जिल्हे किंवा महानगरपालिका पुढील आदेशापर्यंत तिसऱ्या टप्प्यातच राहणार आहेत.
RTPCR टेस्टचा आधार घ्या
हे वाचलं का?
राज्यात सध्या आरटीपीसीआर आणि इतर अनेक प्रकारच्या कोरोना चाचण्यांचा वापर केला जातो आहे. मात्र आता सरकारने स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याविषयी देखील RTPCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांचाच आधार घ्या असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
याआधीच्या मूळ नियमावलीनुसार दर गुरुवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्बंध कमी किंवा जास्त करायचे, यासंदर्भात निर्णय घेतला जाई. ते निर्बंध त्यापुढील सोमवारपासून अंमलात आणले जात. मात्र, आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मार्गदर्शक सूचना
ADVERTISEMENT
आज जी नियमवाली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नव्या सूचनाही देण्यात आले आहेत.
नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणं, जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणं, कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन देणं
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या पद्धतीचा अवलंब करणे
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती आवश्यक
मोठ्या प्रमाणावर RTPCR चाचण्यांचं प्रमाण वाढवणं
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं
गर्दी करणारे किंवा गर्दी होईल असे कार्यक्रम टाळणे
कंटेन्मेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणं
अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT