मुंबई, ठाण्यात Orange Alert! रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

IMD issued red mumbai, pune, satara, konkan region and vidarbha
IMD issued red mumbai, pune, satara, konkan region and vidarbha
social share
google news

मुंबई, ठाण्यात पावसासाठीचा Oragne Alert जारी करण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस पाऊस चांगला कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 13 आणि 14 जून या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. तसंच मुंबईत त्यांनी अलर्टही जारी केला आहे. एवढंच नाही तर पालघर, ठाणे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने खबरादारी घेण्याचं आवाहन केलं असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मे महिन्यात जे तौकताई वादळ आलं होतं त्यावेळीही त्या वादळाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला होता. त्यापाठोपाठ कोकणातही बसला होता. आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात 24 तासात 200 मिमिहून जास्त पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. हा पाऊस अतिवृष्टी म्हणूनच मानला जातो.

एवढंच नाही तर पुढचे पाच दिवस कोकणात अतिमुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम किनापट्टी भागातही जोरदार वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात शनिवारच्या आधी 54 मिमि पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. म्हसळा येथे 100 मिमि पाऊस पडला अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 दिवस आधीच भरला पवई तलाव

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, नागरिकांनी मोठ्या झाडांखाली उभं राहणं टाळावं तसेच बाहेर पडताना स्वताची काळजी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. 13 व 14 जून या कालावधीत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. आजच मुंबईतला पवई तलाव पावसामुळे भरला आहे. गेल्या वर्षी पाच जुलैला हा तलाव भरला होता. यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चोवीस दिवस आधी हा तलाव भरला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT